माझ्या घरी येणाऱ्या अनेक मित्र आणि पाहुण्यांनी माझ्या घराभोवती "ओपन स्पेस'नसल्याचा उल्लेख केला आहे.
ते सत्य असले तरी माझे त्याबद्दलचे मत मी त्यापैकी काहींना सांगितलेले आहे.स्पेस का हवा आहे,याविषयी
मी त्यांच्याकडून जाणून घेतले आहे.त्यापैकी काही उत्तरे
उत्तरादाखल.कोंदटपणा दूर होतो.आकाशदर्शन होते.पाय मोकळा होतो,मन प्रसन्न रहाते.शुद्ध हवा मिळते.हे सर्व खरेच आहे,मी म्हणालो ,
जसे घराला ओपन स्पेस हवा तसा तो मनालाही हवा.घराला नसेल तरीही तो मनाला पाहिजे.घराभोवतीचे
सर्व ब्रम्हांड हे आपल्यासाठी"ओपन स्पेस' असले
पाहिजे.त्याचे ओझे किंवा अडचण न वाटता ते बघून
मनाचा कोंदटपणा गेला पाहिजे.आपण जे आपलं समजतो त्यामध्ये स्वत:ला कोंडून घेतो आणि मग
ओपन स्पेस नसल्याचा कांगावा करतो.आपले मन
किती ओपन आहे यावर स्पेस तयार होतो.कोणतेही घर
कोंदट नसते.फक्त त्या घरातील माणसे मोकळी असावीत.माणसे आखुड, संकुचित,स्वार्थी असली की
ते घर कोंदट वाटते.मोठमोठ्या हवेल्यामध्ये जीव
गुदमरण्याचे कारण हा मनाच्या भोवती नसलेला
ओपन स्पेस आहे.मनाच्या खिडक्या सदैव उघड्या
असल्या की भोवतालची शुद्ध हवा आपणास
प्रसन्न ठेवते.आपला कोंडमारा होत नाही.तुमच्या
घराभोवती नाही तर तुमच्या मनाभोवती ओपन
स्पेस हवा आहे.चला तर आपण अधिक मोकळे,व्यापक,
आकाशाएवढे होऊ या.आकाशाला गवसणी घालू या
ना.रा.खराद,अंबड