आज तुम्ही साठ वर्षांचे झालात आणि
मी पंचवीसी गाठली आहे.
तसा मी तुमच्यासाठी अजुनही लहानच आहे ,
खरे सांगू बाबा, मला तुमच्या समोर
कधीच मोठे व्हायचे नाही.
माझी ही पंचवीस वर्षे तुमचीच तर आहेत
तुमचे बोट धरून मी चालायला शिकलो
तुमच्या अंगाखांद्यावर बालपण
कसे सरले कळालेच नाही.
पण आता मी सगळे समजू लागलो आहे.
माझ्या पायात काटा टोचला की
तुम्हाला वेदना का व्हायच्या !
चपलेचा तुटलेला अंगठा
कित्येकवेळा शिवून घेतांना बघितला मी ,
आता उमगले मला ,
माझ्यासाठी छान शुज घेण्यासाठी
काटकसर होती ती.
लहानपणी मी आजारी असतांना
दवाखान्यात कित्येक रात्री जागून काढल्या तुम्ही.
तेव्हा नव्हते कळत,
पण आता मला कळते आहे,
तुमच्या पाठीवर खेळतांना
फाटकी बनियन अजून फाडायचो मी,
पण माझ्या चिमुकल्या बोटांचा स्पर्श तुम्हाला जास्त
मोलाचा वाटायचा.
बाबा , तुम्ही आता साठीत आहात
किंचित खांदेही झुकलेत तुमचे
पण आठवते त्या खांद्यावर बसून
जगाची सफर केली आहे मी
किती अभिमानाने मिरवायचे तुम्ही मला
खरे बाबा,असे पुन्हा कधीच घडणार नाही
हा विचार मला अशांत करतो
मी जेव्हा बाहेरगावी शिक्षणासाठी चाललो होतो,
किती गहिवरून आले तुम्हाला
लपवून तुम्ही डोळे पुसले होते
आज मला त्याचे मोल कळते आहे
एकदा मला पैसे हवेत होते
तुम्ही म्हणालात, थांब थोडा वेळ
दोन तासांनी तुम्ही परतलात हसत मुखाने
मला आज कळाले कित्येक ठिकाणी
याचना करुन ते तुम्ही जमवले होते व
खोटे हसू मुखावर आणले होते
अजून एक सांगू बाबा
मी झोपेत असतांना,
माझ्या डोक्यावर तुम्ही हात ठेवायचे
मी जागे असायचो पण झोपेचे सोंग करायचो
बाबा इथे मी तुमच्याशिवाय रहातो
कधी कधी झोपेतून दचकून उठतो
तुमचा हात शोधण्यासाठी!
-तुमच्यासाठी कायम लहान
मी पंचवीसी गाठली आहे.
तसा मी तुमच्यासाठी अजुनही लहानच आहे ,
खरे सांगू बाबा, मला तुमच्या समोर
कधीच मोठे व्हायचे नाही.
माझी ही पंचवीस वर्षे तुमचीच तर आहेत
तुमचे बोट धरून मी चालायला शिकलो
तुमच्या अंगाखांद्यावर बालपण
कसे सरले कळालेच नाही.
पण आता मी सगळे समजू लागलो आहे.
माझ्या पायात काटा टोचला की
तुम्हाला वेदना का व्हायच्या !
चपलेचा तुटलेला अंगठा
कित्येकवेळा शिवून घेतांना बघितला मी ,
आता उमगले मला ,
माझ्यासाठी छान शुज घेण्यासाठी
काटकसर होती ती.
लहानपणी मी आजारी असतांना
दवाखान्यात कित्येक रात्री जागून काढल्या तुम्ही.
तेव्हा नव्हते कळत,
पण आता मला कळते आहे,
तुमच्या पाठीवर खेळतांना
फाटकी बनियन अजून फाडायचो मी,
पण माझ्या चिमुकल्या बोटांचा स्पर्श तुम्हाला जास्त
मोलाचा वाटायचा.
बाबा , तुम्ही आता साठीत आहात
किंचित खांदेही झुकलेत तुमचे
पण आठवते त्या खांद्यावर बसून
जगाची सफर केली आहे मी
किती अभिमानाने मिरवायचे तुम्ही मला
खरे बाबा,असे पुन्हा कधीच घडणार नाही
हा विचार मला अशांत करतो
मी जेव्हा बाहेरगावी शिक्षणासाठी चाललो होतो,
किती गहिवरून आले तुम्हाला
लपवून तुम्ही डोळे पुसले होते
आज मला त्याचे मोल कळते आहे
एकदा मला पैसे हवेत होते
तुम्ही म्हणालात, थांब थोडा वेळ
दोन तासांनी तुम्ही परतलात हसत मुखाने
मला आज कळाले कित्येक ठिकाणी
याचना करुन ते तुम्ही जमवले होते व
खोटे हसू मुखावर आणले होते
अजून एक सांगू बाबा
मी झोपेत असतांना,
माझ्या डोक्यावर तुम्ही हात ठेवायचे
मी जागे असायचो पण झोपेचे सोंग करायचो
बाबा इथे मी तुमच्याशिवाय रहातो
कधी कधी झोपेतून दचकून उठतो
तुमचा हात शोधण्यासाठी!
-तुमच्यासाठी कायम लहान
.......