धन

              ‌धन
                       - ना.रा.खराद
 समाजात थोडेसे लोक 'धन' वान आहेत, त्यांना धनदांडगेही म्हणतात.बरेचसे धनवान
होऊ पहात आहेत तर बहुतेक निर्धन आहेत.
धन देखील विविध प्रकारचे असते.
  मिळालेले,मिळवलेले,बळकावलेले,हडपलेले,चोरलेले, कमावलेले ,सापडलेले वगैरे.धन बऱ्या,वाईट दोन्ही प्रकारच्या लोकांकडे असते.धनाचा हवा तसा वापर होतो.धन कसे कमावले यावरून त्यांची प्रत ठरते.कष्टाने कमावलेले अल्पधन देखील मोलाचे असते.
काही ठराविक लोकांकडे गडगंज संपत्ती असते.खर्चाचा हिशोब ठेवण्याची गरज नसते.
 व्यापारी नफा कमावतात.नोकरदारास ठराविक पगार मिळतो.शेतकरी , शेतमजूर काबाडकष्ट करुन पैसे मिळवतात.धनवान लोकांना त्यांच्यासाठी राबणारे मनुष्यबळ हवे असते म्हणून गरजवंतला रोजगार मिळतो.
   गरजेतून माणसे एकमेकांची जपवणूक करतात.वारसाने मिळणारे धन , त्यामुळे ठराविक घराणे कायम धनवान रहातात.नव्याने धनवान बनने तसे सोपे नसतेच.सरळ मार्गाने धन कमावणे तसे कठीणच , काहींना ते जमते हे वेगळे.नशीबाने धनवान बनलेले काही माणसे असतात.कष्टाने धन कमावले जाते, परंतु फार विलंब होतो.
  येणेकणे मार्गाने धन कमावले जाते.स्वत: न 
कमावता देखील अनेकांकडे धन असते.त्यांना ते फक्त उडवायचे असते.अगोदरच्या पिढीने कमावलेले धन असते.वारसाने ते मिळते.बहुतेक लोक पीढीजातच धनवान असतात.
   काहीसे लोक शून्यातून विश्व निर्माण करणारे असतात.इतरांना त्यांचा हेवा वाटतो.दैनंदिन गरजा भागतील एवढेही धन त्यांच्याकडे नसते.धन सोबत आणलेले नसले तरी जन्मासोबतच ते लाभलेले असते.धन नसेल तर ते कोणत्याही मार्गाने मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.उजळमाथ्याने कमावलेले
धन तेजस्वी बनवते.फूकटचे धन मिंधे बनवते.
चोरलेले धन चोरुन खर्च करावे लागते.लुबाडलेले धन कलह निर्माण करते.भ्रष्टाचाराचे धन समाधान देत नाही.
कष्टाचे धन तृप्ती देते.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.