- ना.रा.खराद
नवरा म्हणजे बायकोच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी धडपडणारा एक दूर्बळ मानव प्राणी! हा प्राणी घराघरात सापडतो.बायकोच्या मागण्याने सतत त्रस्त असतो.बायकोच्या इच्छा पूर्ण करणे हेच त्याचे एकमेव ध्येय असते.त्याची आवड निवड गुंडाळून ठेवलेली असते.तो फक्त भारवाहक असतो.
माहेरी पूर्ण न झालेल्या सर्व इच्छा ,बायको सासरी पूर्ण करु पहाते.माहेरी जशी लाडाची लेक असते तशी सासरी लाडकी बायको असते.बायकोचे लाड पूरविणे हे नवरोबाचे कर्तव्य असते.आखिल नवरोबाची पिळवणूक
ही बायको नावाची वाळवी करत असते.
कमाई, परिस्थिती वगैरेचे तिला सोयरसुतक
नसते.तीची समजूत काढणे यामध्ये आयुष्य
जाते.नवरा बाहेर निघाला आणि त्यास काही
आणायचे सांगितले नाही अशी बायको अजून
तरी आढळली नाही.श्रीरामा सारख्यांना पण सोन्याच्या हरिणाचा पाठलाग का करावा लागला हे आम्ही विसरलेलो नाही.
दारावर विक्रिसाठी आलेली प्रत्येक वस्तू आपण खरेदी केलीच पाहिजे असे त्यांना वाटते.शेजारणीची बरोबरी करणे हा बायकांचा मूळधर्म असतो.वस्तूंची गरज असो
वा नसो,खरेदीची हौस मात्र खुप असते.
बायको सोबत खरेदीला गेलेला नवरा मोठा
केविलवाणा असतो.फक्त बील देणे याशिवाय
तो काहीच बोलू शकत नसतो.अब्रू जाण्याची
भिती ,जी नेहमी पुरुषांनाच असते.दुकानदार
देखील साड्यांचे नवे वाण दाखवतो.घरात अगोदरच्या साड्या, दोन आठवड्यात जुन्या आणि कालबाह्य झालेल्या असतात.नवी साडी दिसताच ,अगोदरची जूनी वाटणे स्री जातीचा अजब स्वभाव असतो.न बघता पसंद
केलेला नवरा , बायको साडी पसंत करतांना
लावणारा वेळ निमूटपणे सहन करत असतो.
बायकोचा आत्मा कायम असंतुष्ट असतो.नवरोबाची कमाईवर कायम डोळा असलेली बायको ,केवळ अर्धांगिनी नाही तर पूर्णागिंनी भासू लागते.धूवायला टाकलेल्या विजारीतील विसरलेले पैसे इमानदारीने परत
न करणारी बायको.लटकवलेल्या पैंटमधून
अलगदपणे नोट काढणारी बायको.खोटे बोलून पैसे उकळणारी बायको ज्यास लाभलेली असते ,तो नवरा अर्धमेला असतो.
बायको युद्धावर निघालेल्या नवऱ्याला लसूण
आणायचा सांगू शकते.तो मेल्यावर देखील
आता माझे कसे होईल अशी ओरडत असते.
नवरा हे एक हक्काचे स्थान असते.बापाची परिस्थिती नाही म्हणून माहेरी गप्प रहाणारी पोरगी ,सासरी मात्र कुबेराघरीअसल्यासारखी मागण्या करत असते.
मला आवड आहे,माझी इच्छा आहे,माझे स्वप्न
आहे असे बोलून आपल्या मागण्या नवऱ्यासमोर मांडत असते.आईची एकही इच्छा पूर्ण न करणारा नवरा बायकोची मात्र प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. बायकोसोबत मार्केटला गेलेला नवरा
पूरता कंगाल झालेला असतो.चिकट नवरा बायकोला ब्याद वाटते.उधळे नवरे पैसे शिल्लक ठेवत नाहीत.जो कमाईच बायकोकडे देतो तो सर्वश्रेष्ठ नवरा मानला जातो.
आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी बायका अनेक घरगुती आंदोलने करतात.जहाल आणि मवाळ अशा
दोन्ही तंत्राचा वापर करतात.नवरा बिचारा त्यामध्ये भरडला जातो.दु:ख सांगणार कुणाला, त्याचे सारखेच !
नवऱ्याची ऐपत न बघता, मागण्या केल्याने नवरा मेटाकुटीला येतो.समाधानी बायको दुर्मिळ आहे.
लग्नात आलेल्या भेटवस्तू निरुपयोगी असतात.भेट देण्यासाठी त्या उपयोगी पडतात.
नवरा घराबाहेर पडताना त्यास काहीच मागणी न करणारी बायको कुठेच नाही.तो जेवताना काहीतरी मागणार.बायकोची इच्छा पूर्ण करण्यासाठीच नवरा असतो , असेही म्हणायला हरकत नाही.