शिवराय तुम्ही असता तर...!

       शिवराय तुम्ही असता तर...!
                            - ना.रा.खराद

  आज जे सर्वत्र बघायला मिळते
तेव्हा वाटते, शिवराय तुम्ही असते तर..
तुम्ही असतांना ज्या लोकांनी तुम्हाला छळले
 तेच आणि तसेच लोक आज हुकूमत गाजवत आहेत
त्यांना कुणाचीही भीती उरली नाही
उलट, लोकशाहीच्या आडून
त्यांचे छुपे वार चालूच असतात
शिवराय, तुम्ही असता तर 
यांचा केव्हाच कडेलोट तुम्ही केला असता
तुम्ही जे मिळवले, 
ते स्वतःच्या हिंमतीने आणि कर्तृत्वाने, 
मात्र आम्ही जे मिळवत 
आहोत ते फक्त लाचारीने, हुजरेगिरीने
शिवराय, तुम्हीच उगीच खस्ता खाल्ल्या
मरु द्यायचे असते,या नतभ्रष्टांना आणि
षडांना,सडू द्यायचे असते या गुलामांना
शिवराय, तुम्ही असता तर नसते ठेवले
तुम्ही असले भिकारचोट जे तुमच्या नावाचा
गैरवापर करतात, परंतु एकाही गुणांचा
अंगिकार करत नाहीत
रात्रीच्या काळोखात तुम्ही,
स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते 
मोठ्या दिमतीने पार पाडले , 
आम्ही तुमचे वारस
खरेच त्या लायकीचे आहोत का
लोकशाहीच्या गोंडस नावाखाली
रयतेची चाललेली लूट कोण रोखणार
सर्व सैन्य फक्त लुटारूंच्या रक्षणासाठी
मग आम्ही कुणाकडे बघायचे
आपल्या स्वार्थासाठी,आपला स्वाभिमान
गहाण ठेवणारी माणसे बघितली की 
आपण खरेच शिवरायांच्या महाराष्ट्रात रहातो का
हा प्रश्न पडतो
आपल्या नावाचा उदोउदो सर्वच करतात,
परंतु कुणीही आपला आदर्श पाळत नाहीत
मग हे कसले आपले मावळे हे तर स्वार्थी कावळे
शिवराय ,आपल्या नावाचा गैरवापर
आता किळसवाणा वाटू लागला आहे
आपणास मिळणारे हारतुरे केवळ
स्वार्थासाठी आहेत
शिवराय, पुन्हा जन्माला या आणि
तुमच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या 
लोकांना धडा शिकवा!
                       ‌   
  
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.