"छोट्यामुलांसाठी: सोप्या आणि मजेदार शिक्षण" तुमच्यासाठी कायम लहान....................?

प्रिय बाबा,


आज तुम्ही साठ वर्षांचे झालात आणि मी पंचवीसी गाठली आहे.तसा मी तुमच्यासाठी अजुनही लहानच आहे ,खरे सांगू बाबा, मला तुमच्या समोरकधीच मोठे व्हायचे नाही.माझी ही पंचवीस वर्षे तुमचीच तर आहेततुमचे बोट धरून मी चालायला शिकलोतुमच्या अंगाखांद्यावर बालपण कसे सरले कळालेच नाही.पण आता मी सगळे समजू लागलो आहे.माझ्या पायात काटा टोचला की तुम्हाला वेदना का व्हायच्या !चपलेचा तुटलेला अंगठा कित्येकवेळा शिवून घेतांना बघितला मी ,आता उमगले मला ,माझ्यासाठी छान शुज घेण्यासाठी काटकसर होती ती.लहानपणी मी आजारी असतांना दवाखान्यात कित्येक रात्री जागून काढल्या तुम्ही.तेव्हा नव्हते कळत, पण आता मला कळते आहे, तुमच्या पाठीवर खेळतांना फाटकी बनियन अजून फाडायचो मी,पण माझ्या चिमुकल्या बोटांचा स्पर्श तुम्हाला जास्तमोलाचा वाटायचा.बाबा , तुम्ही आता साठीत आहातकिंचित खांदेही झुकलेत तुमचेपण आठवते त्या खांद्यावर बसूनजगाची सफर केली आहे मीकिती अभिमानाने मिरवायचे तुम्ही मलाखरे बाबा,असे पुन्हा कधीच घडणार नाहीहा विचार मला अशांत करतोमी जेव्हा बाहेरगावी शिक्षणासाठी चाललो होतो,किती गहिवरून आले तुम्हालालपवून तुम्ही डोळे पुसले होते आज मला त्याचे मोल कळते आहेएकदा मला पैसे हवेत होतेतुम्ही म्हणालात, थांब थोडा वेळदोन तासांनी तुम्ही परतलात हसत मुखानेमला आज कळाले कित्येक ठिकाणीयाचना करुन ते तुम्ही जमवले होते वखोटे हसू मुखावर आणले होतेअजून एक सांगू बाबामी झोपेत असतांना, माझ्या डोक्यावर तुम्ही हात ठेवायचेमी जागे असायचो पण झोपेचे सोंग करायचोबाबा इथे मी तुमच्याशिवाय रहातोकधी कधी झोपेतून दचकून उठतोतुमचा हात शोधण्यासाठी!

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.