"वाचनाच्या अपूर्व जगातील सहयोगी: नावात काय..."

 प्रत्येकाचं नावं ठेवलं जातं. आई वडील किंवा तत्सम व्यक्ती नाव ठेवतात.लाखों असलेल्या नावातूनच ते ठेवले जाते.नामकरण सोहळे होतात.त्याच नावाने तो कायम ओळखलाजातो , मृत्यूनंतर ही तेच नाव रहाते ,इतके त्या नावाचे महात्म्य आहे , परंतु मनात येईल ते नाव ठेवले जाते, पण पुढे मुलाचे गुण आणि नाव यामध्ये कुठलेही साधर्म्य आढळत नाही.किंबहुना नावाच्या विपरीतच मुले निवडतात.कित्येक प्रकाश अंधारात चाचपडतात.
विद्यासागर नाव असणारे अनेक निरक्षर असतात. एकनाथ,नामदेव,ज्ञानदेव, पांडूरंग ,नारायण नाव असणारे एकादशीला हाडकं फोडतात. कर्ण नाव असणारे कित्येक हलकट आहेत.लक्ष्मी नाव असणारी बाई कंगाल असते.विद्या नाव असून दहावीत नापास असते. राम नाव असणारे अनेक हरामी आहेत. तुकाराम ,एकनाथ, वगैरे नाववाले ते ग्रंथ वाचू देखील शकत नाही.
कशाची हौस नसणारी हौसाबाई असते. शिवाजी नाव असणारे कधी लढतांना दिसत नाही. कित्येक गणेश पोट नसलेले असतात.कांता कांतिहीन असते.सुवर्णा कोळशासारखी असते.रत्नाकर कंगाल असतो.चंद्रकला, सूर्यकला कुठलीच कला नसलेल्या असतात.रंभा वगैरे कुरूप असतात.
नद्यांची नावे असलेल्या पाण्यासाठी भटकतात.प्रकाश अंधारात चाचपडतो.रत्नमालाच्या गळ्यात फूटका मणी नसतो.सुनिता हि नितीहीन असते. गोकूळकडे गाय नसते.सुधीरला धीर नसतो.संतोषमध्ये कायम असंतोष धुमसतो.कित्येक अमृता मरण पावल्या आहेत.अरुण हा
कर्जात बुडालेला असतो.गंगासागर हंडाभर पाण्यासाठी
गावभर फिरते.दगडू नावाची माणसे मेणासारखी मऊ आढळतात तर कोमल नावाची मुलगी अगदी दगडासारखी असते.विवेक नाव असलेले कित्येक विवेकहीन असतात.गौतम वगैरे असलेले हिंसक असतात.कुंभकर्ण नाव असून जो झोपेतून दचकून उठतो.लक्ष्मण नाव असून भावांशी सतत भांडतो. ऐश्वर्या असून लोकांची भांडी घासते.अजय हा प्रत्येक निवडणुकीत पडलेला असतो.दमयंती कायम नलाच्या शोधात असते.रोशनी काळीकुट्ट असते,तर दिपक अंधारात चाचपडत असतो.अभिषेक कधीच मंदिरात गेलेला नसतो.शंकर सापाला घाबरतो.हिमालयाला उंची नसते.श्रावण बापाला लाथा घालतो.सत्यनारायण खोटारडा असतो.वैभव नाव असून अडगळीत पडलेला असतो.व्यास असून एक ओळ लिहिलेली नसते.रविंद्र असून राष्ट्रगीत पाठ नसते.कमलला चिखलाचे
वावडे असते.सुमनचे मन कपटाने भरलेलेअसते.कल्याण नाव असून कंगाली सोडत नाही.अनेकांच्या नावात साहेब शब्द असतो पैकी बहुतेक छोटे मोठे काम करतांना आढळतात.अनेकांच्या नावात राम असतो पण त्यांच्यात नसतो.सुलोचनाला लहानपणीच चष्मा लागलेला असतो.
नाव हे फार उशीरा ठेवले पाहिजे. त्या मुलांमध्ये कोणते गुण आहेत. त्यावरून ठेवले पाहिजे. जेणेकरून ते सोयीचे होईल.
या लेखाचा उद्देश नाव ठेवणे नसून , ठेवलेल्या नावाचा आदर करणे हा आहे.सर्व नावे सुचतील तशी आली आहेत, कुणाच्या बाबतीत हे हेतूपुरस्सर लिहिलेले नाही,तसे आढळल्यास तो एक योगायोग समजावा.सर्वांच्याच नावाबाबत असे होते असे नाही.
नावात काय असतं, असं म्हटलं जातं,हे जरी खरे असले
तरी नावावरुनच सगळं काही चालतं.म्हणून वाटते नाव
फार विचारपूर्वक ठेवले पाहिजे.खरेतर नाव आठ दहा वर्षांनंतर त्या मुलाचे वर्तन गुण दोष लक्षणं बघूनच ठेवले
पाहिजे , जेणेकरून नावात काय असतं असं कुणी म्हणणार नाही.
- नारायण खराद
Tags

एक टिप्पणी भेजें

1 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Bhagwan Sangule ने कहा…
अतिशय सुंदर विचार नाराजी 👍👍