माकड म्हणतं...!

               माकड म्हणतं..
                             - ना.रा.खराद



अनेक माणसांना इतरांना मूर्ख बनवणे किंवा समजणे खुप आवडते,पण तसे कधीच नसते,
आपल्या पेक्षा समोरचा जास्त हुशार आहे असे
समजणेच फायद्याचे असते.कदाचित ते खरे नसले तरी त्याच्याशी चूकीचे,खोटे बोलण्याचे टाळले जाते आणि खरे असेल तर अजुनच उत्तम.
        स्वत:ला इतकेही शहाणे समजू नये की इतर सर्व मूर्ख वाटू लागतील.एकाच वेळी अनेक लोक शहाणे असू शकतात हे विसरु नये.अनेक नामांकित लोक इतरांना काहीच मोल देत नाहीत.प्रशंसा , मार्गदर्शन, सूचना असे काहीच करत नाहीत त्याचे कारण अहंकारच आहे.मी प्रथम आणि शेवटी देखील मीच,असे त्यांना वाटू लागते.
      एखाद्या श्रीमंत माणसाला असाच गर्व होतो,मी
सर्वांत श्रीमंत ,असेच त्यास वाटतअसते.इतरांनी त्याची बरोबरी करु नये किंवा ते करु शकत नाही असा त्यांचा समज असतो, जो पूर्णपणे चूकीचा असतो.यशाच्या शिखरावर असणारे लोक ,हवेत उडत असतात, त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे यश मिळवणारे असतात परंतु हे अहंकारी लोक त्याच्याकडे डोळेझाक करतात.
इथे कुणीच अंतिम नसतो.या जगात एकाचढ
एक लोक असतात.
अमूकचा कुणी हात धरु शकत नाही ,असे विधान कायम असत्य ठरते.या जगात एकासारखे अनेक असतात पैकी आपण असू शकतो एवढेच!
स्वतः ला श्रेष्ठ समजत असतांना, इतरांना कमी
लेखण्याची चूक करु नये कदाचित तुमच्यापेक्षा
तो श्रेष्ठ असू शकतो किंवा ठरु शकतो.आज जो
मागे आहे ,तो उद्या पुढे असू शकतो.
     पैशावाले लोक तर स्वतः ला ईश्वर समजू लागले
आहेत.फायद्यासाठी त्यांच्याभोवती जो लोकांचा
गराडा असतो , त्यामुळे ते स्वतः ला फारच मोठे
समजू लागतात.पैशांतून येणारा अहंकार फारच
टिकाऊ असतो.मला कुणाची गरज नाही,मी काहीही करु शकतो ही भावना लयाला घेऊन जाते.
आपल्या सारखे आपण एकटे कधीच नसतो.
आज जे आहे ते काल नव्हते कदाचित उद्या ते
असणार नाही त्यामुळे स्वतः ला सर्वस्व समजण्याची चूक करु नये.स्वत:इतकेच किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्त महत्त्व इतरांना दिले पाहिजे.
तुम्ही सत्तेवर असा, श्रीमंत असा, प्रसिद्ध असा परंतु फक्त तुम्हीच नाहीत हे लक्षातअसू द्या.
      एखाद्या पदाने , पुरस्काराने हुरळून जाऊ नका.
कदाचित तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कुणी असू शकेल,असतोच असे गृहीत धरा आणि आपला अहंकार कमी करा.इतरांना कमी लेखून त्यांच्या पासून अलिप्त राहू नका.अविर्भाव सोडून द्या.
आपण कुणीतरी मोठे आहोत हा तोरा मिरवू नका .
आपल्या सारखे खुप आहेत असे समजा,लोक आपल्यापेक्षा हुशार आहेत असे समजा.
कुणालाही कमी लेखू नका,मूर्ख बनवू नका व
तसे समजू नका.एकदा असे करुनच बघा आणि घ्या अनुभव !
                 
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.