अरे माणसा,

 अरे माणसा,


 तुझी आजची केविलवाणी दशा बघून 
मला नक्कीच वाईट वाटते
मात्र त्याचबरोबर तुला तुझी 
किंमत कळत आहे, 
याचे समाधानही वाटते
दोन वासनांध व्यक्तीच्या संसर्गामुळे
जन्माला आलेला तू 
किड्यामुंगीएवढेच तुझे आस्तित्व
पण सम्राट बनण्याची तुझी महत्वाकांक्षा
भाकरीच्या एका तुकड्यांवर जगु शकणारा
जगाच्या कोठाराचा मालक बनू पहातो
सहा फूट जागेची गरज तुला पण
तु चंद्रावर देखील इमले बांधण्याचे
स्वप्न बाळगतो
क्षणाचा भरवसा नसतांना
युगांच्या भाषेत बोलतो
संकटाच्या एका झटक्यात
तु कुठे जाऊन पडतोस
मग कशाला मिरवतो
विजयाच्या पताका आणि
बडवतो कानठळ्या बसणारे नगारे
घोटपर पाण्याची तहान तुझी
पण तुला हवे असतात
सात समुद्र महत्वाकांक्षेचे
आग विझवायला
असतो मलमुत्र,हड्डी मांस
ह्यात नऊ महिने बरबटलेला
उगीच लटके झटके दाखवित
फिरतो जगाला
अज्ञानी असुन तू
ज्ञानाचा महिमा गातो
तोड नाही तुझ्या या ढोंगाला
जोरावर तलवारीच्या
वेठीस धरतो जनसामान्यांना
मरण येते जेव्हा दाराला
तलवार येत नाही कामाला
किती खेळ तुझे
किती सोंग तुझे
पार नाही तुझ्या बालिशपणाला
भरतो तिजोऱ्या लुटून जगाला
अंत समयी येत नाही वाचवयाला
जहांपनाह बनून तू फिरतो
बेपनाह होऊन तू मरतो
तुला गर्व असतो ,माज असतो
सत्ता संपत्तीचा 
अखेर कळते ,चुकलो होतो
खऱ्या ज्ञानाला मुकलो होतो
आता तरी धडा घे
माणूसकीचा वसा घे
घेतला वसा सोडू नको
अंतसमयी रडू नको.
                     
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.