बाप

                  बाप

बाप! मुलांचा खरा ईश्वर जो पुजापाठाविना सतत पाठराखण करतो.गरीब असो वा श्रीमंत, आपल्या मुलांसाठी जीवन खर्ची घालतो.आईच्या गर्भात असल्यापासून जो काळजी घेतो.जन्म झाला की बापाचा आनंद गगनभर पसरतो.
एकाच वेळी पत्नी आणि मुलाची तो काळजी घेतो.नोकरी उद्योग करून जो पैसा कमावतो.
आपल्या मुलाच्या शाळा प्रवेशासाठी जो वणवण भटकतो.प्रसंगी हात जोडतो. डोनेशन भरतो.आपला मुलगा शिकून मोठा व्हावा असे स्वप्न बाळगतो.
मुलगा आजारी पडला तर त्याला दवाखान्यात घेऊन जातो.रात्र जागून काढतो.
 आपला मुलगा लवकर बरा व्हावा अशी ईश्वरास मनोमन प्रार्थना करतो.कामावरून थकून येतांना मुलांसाठी खायला आणतो.ह्यातच समाधान मानतो.
बाप भित्रा असला तरी मुलांसाठी वाघ होतो. गरीब असला तरी मुलांसाठी राजासारखा उदार होतो. बापाचे मन आभाळाएवढे असते.
 बाप म्हणजे प्रेमाचा सागर असतो.संकटात बाप जवळ असला की चिंता वाटत नाही. सारे दुःख बाप पचवतो.
तुझ्या बापाचे खातो का,मी तुझ्या बापाला भित नाही,हे पैसे तुझा बाप देईल का,बापाचा माल समजतो काय,तुझा बाप आला तरी सोडणार नाही. असल्या विधानातून ही बापाचे आस्तित्व दिसते.
 शाळेत शिक्षक देखील तुझ्या बापाला घेऊन ये तरच शाळेत ये.काही बरे वाईट घडले की बापाचे नाव विचारले जाते. बापाचे नाव कमावले असे बोलले जाते.
प्राण्यात बाप नसतो. फक्त आई असते. कुत्रीची पिले असो वा डूकरीणीचे आईमागेच फिरतात. परंतु मनुष्य जातीत बाप जास्त महत्वाचा आहे. मुलाच्या नावासमोर बापाचे नाव लावले जाते. बाप करोडपती असला तर
त्याची सर्व संपत्ती मुलांना मिळते.किती दिव्य 
गोष्ट.बापाच्या मांडीवर मुल मोठं होतं आणि मुलाच्या मांडीवर जगाचा निरोप घ्यावा असे बापाला वाटते.
 आईचे गोडवे गायले जाते परंतु घरातून बाप वगळला तर काहीच उरत नाही. आईचे ते प्रेम आणि बापाचे ते कर्तव्य? हे कर्तव्य प्रेमच असते. बाप फक्त रडत बसत नाही तर अश्रू थोपवून मुलांचे अश्रु  पुसतो.आपल्या बापाचे प्रेम कळले पाहिजे. फाटक्या धोतराने पुसलेले अश्रु विसरु नये. आजारपणात उशाला बसलेला बाप विसरू नये. कर्ज काढून फिस भरणारा बाप कसा विसरला जाऊ शकतो.झोपेत देखील कपाळावरून हात फिरवणारा हा बाप नावाचा देवदूत ज्यास कळला ते भाग्यवान होत.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.