मित्रांच्या वर्गीकरणात , वर्गमित्र असतो किंवा असतात.शाळा डोक्यातून कधीच जात नाही,जिथे अनेक मित्र अनायास लाभतात ती शाळा कशी विसरता येणार.शाळेतले शिक्षण संपले की पाखरं उडावित तशी जो तो आपल्या वाटेने जातो आणि मग विसाव्याला आठवतात आपले वर्गमित्र.अगदी दहा वीस वर्षांनंतर आपसूकच भेट होते आणि भूतकाळात घेऊन जाते.किती किती आठवणी असतात.शिक्षकांच्या केलेल्या खोड्या,खोटे बोलून मिळवलेली सुट्टी, एखाद्या वर्गमित्राशी तिच्यावरुन झालेले भांडण.शिक्षकांकरवी दिलेला मार.तीचा तो कटाक्ष सर्व काही रोमांचक.
भूतकाळातील आठवणीत काही काळ वर्तमान थांबलेला असतो.मग मनसोक्त गप्पा
होता.अरेतुरेची भाषा ऐकायला आणि बोलायला मिळते.तेव्हा फाटकी चड्डी घालणारा आज एखादा साहेब किंवा नेता झालेला असतो.शिव्या खावून देखील गालावर हसू उमटते ते या वर्गमित्रामुळेच.कधीच न हसणारा
एखादा मित्र भेटला की ,अरे हा अजून पण हसला नाही वाटतं.सगळे खळखळून हसतात.
लग्न पोरं याबद्दल विचारपूस होते.कुणाचे तरी काही वाईट ऐकायला मिळते तेव्हा सगळे हळहळतात.असे नको व्हायला पाहिजे होतं,असे कुणीतरी बोलते.आपल्या वर्गमित्राची दैना त्यांना देखवत नाही.अरे तो आपला .. अधिकारी आहे.सर्वांना आश्चर्य होते, अभिमान वाटतो.शाळेत असतांना हलाखीची परिस्थिती
असणारा आता धनाढ्य असतो.सर्वांना कुतूहल वाटते.या रे सर्व माझ्याकडे, तेव्हा सर्वजण होकार देतात.
सुट्टीच्या दिवशी वर्गमित्र खेळायला सोबत असायचे .ते गळ्यात हात टाकून फिरणे नंतर
बघायला आणि अनुभवयाला मिळाले नाही.
वर्गमित्रांची खिल्ली उडवणे हा तर जन्मसिद्ध हक्कच होता.शिक्षकांनी दिलेली उपमा त्यास
कायम चिकटविण्याचे कार्य वर्गमित्र करायचे.पुढे ते आजतागायत.
वर्गमित्रांचे एकमेकांच्या घरी कायम ये जा असायची.मोठ्यांचा आदर हा लहानांच्या अंगी
होता.घरातून खिशात आणलेला खाऊ आपल्या वर्गमित्रांनाही खाऊ घातला जात असे.माझा
एक मित्र घरुन पुडीमध्ये खव्याचा पेढा घेऊन येत असे आणि गुपचूप मला देत असे.इतर मित्र
त्याला म्हणायचे, आम्ही काय केले होते रे.शरीराच्या ठेवणीवरुन मित्रांना नावे ठेवण्याची
त्यावेळी मुभा होती.रंग ,उंची,इतर अवयव यांचा हिशोब व्हायचा.शाळेची घंटा हा मंदिरात घुमणारा नाद वाटायचा.गावभर तो आवाज घुमायचा.गावातील लोक देखील घंटीच्या तालावर चालायचे.वर्गमित्रांचे घोळके मग शाळेच्या दिशेने धावायचे.वह्यांची देवाणघेवाण व्हायची.तीची वही घेतली किंवा दिली की प्रतिष्ठा वाढायची.मित्र म्हणायचे,तुला भाऊ समजती रे.किती गंमत असायची.मित्र दु:खी दिसला की सर्व हळहळ करायचे. अश्रु पुसायचे.हा दिलासा दिलासादायक होता.
वर्गमित्रांसोबत कधी कट्टी व्हायची.कुणीतरी मध्यस्थी करायचे, पुन्हा समेट.वर्गमित्रांचे आई
वडील आपल्या मुला बद्दल इतर मित्रांना विचारपूस करायचे.हलकेफूलके खोटे बोलणे
चूकीचे मानले जात नव्हते.आपल्या नाकाचा शेंबूड मित्रांच्या शर्टला पुसण्याचा तो काळ होता.
वर्गमित्राची खोडी केली की घरी भांडण यायचे.पोरं हे, चालायचं.असे म्हणून कुणी दुर्लक्ष करायचे.वर्गमित्राची सायकल सार्वजनिक होऊन जायची.एक चक्कर म्हणत सायकल शिकून घ्यायची.आपण जरी आता शाळेत नसलो तरी आपल्यातील शाळा कधीच जात नाही.वर्गमित्र हा आपला अमूल्य ठेवा आहे,तो कायम जतन करून ठेवला
पाहिजे.शाळेतील वर्गमित्र तर कधीच नाही.
सर्व वर्गमित्रांना समर्पित लेख !