प्रिय भारत देशा , स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! अत्यंत अनुभवी असूनही तुला त्या गोऱ्या कातडींच्या मुठभर लोकांनी गुलाम बनवलं तुला दिडशे वर्षे अतोनात छळले

प्रिय भारत देशा,
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!
अत्यंत अनुभवी असूनही
तुला त्या गोऱ्या कातडींच्या
मुठभर लोकांनी गुलाम बनवलं
तुला दिडशे वर्षे अतोनात छळले
तुझी नासधूस केली
तुझे वैभव लुटले
तुझ्या तेहतीस कोटी लेकरांना
खुप सतावलं,तेव्हा
तुझे डोळे पाणावले
तु हतबल होतास
मुळात तु मोठ्या मनाचा
कित्येक परकियांनी तुझी
नुसती लुट केली
तु फक्त मुकपणे बघत होता
ब्रिटिश तर व्यापारी म्हणूनच
आले होते , परंतु तुझा मोहच
असा की त्यांना तुला सोडवेना
पण तुझी लेकरे व्याकुळ होती
आक्रोश करत होती
तुला वाचवण्यासाठी धडपडत होती
कित्येकांनी तर आपले प्राण
तुझ्यासाठी अर्पण केले
पारतंत्र्यातल्या त्या जखमा
आजही ताज्या आहेत
तुझ्या मनावर त्या कोरलेल्या आहेत
इंग्रजांच्या अगोदरही तुझे
कित्येकांनी तुकडे केले
स्वत:ला राजा म्हणून मिरवले
तुझी काही लेकरे तशीच
उपेक्षित,शोषित राहिली
सगळ्यांची आक्रमणे तू
परतूनी लावलीस
तुझ्या काही सपूतांनी
तुझी पूजा केली
तुलाच आपली माता मानलं
आणि इंग्रजांच्या जोखडातून
मुक्त करण्यासाठी
जीवाची बाजी लावली
त्या शुरवीर,स्वाभिमानी पुत्रांनी
तुझे पांग फेडले
स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला
तुला पुन्हा तुझे तुकडे
बघायला मिळाले
तुझ्या लेकरांनी तुझ्या मांडीवर
सांडलेले रक्त तुला खुप
वेदना देऊन गेले
आज तुझा तिरंगा ध्वज
लाल किल्ल्यावरून मोठ्या
दिमाखात फडकत आहे
हे बघून आमचे उर दाटून येते
तु कायम असाच फडकत रहा
आपल्या कोट्यावधी लेकरांना
आशिष देत रहा
पुन्हा एकदा शुभेच्छा!
तुझेच एक लेकरु
‌नारायण

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.