जैसे ज्याचे कर्म..

                                     जैसे ज्याचे कर्म..
                                                      - ना.रा.खराद


माझे पोट भलतेच दुखु लागले ,त्याचे कारणही तसेच होते,मक्याची भली मोठी दोन
कणसे मी फस्त केली होती तीही बारीक न चावता.त्याच कर्माचे फळ मी भोगत होतो.
'क्षणाचे सुख दीर्घकाळची पोटदुखी असते.' असा एक विचारही मनात येऊन गेला आणि
मग हाच धागा पकडून ,आपले संपूर्ण आयुष्य कर्म आणि त्याची फळे याच्याभोवतीच फिरत
असते असे लक्षात आले.कारणाशिवाय काही घडत नसते.केलेले किंवा झालेले कर्म आपल्या मागावर असते.
'पेरावे तेच उगते म्हणतात.' ते उगीच नाही.
आपले मन , बुद्धी जसा विचार करते ते देखील कर्म आहे, त्यानुसार जीवन आकार
घेत चालते.जीवन आपणास कोणत्या दिशेने घेऊन चालले हे ठाऊक नसते.अचानक झालेला लाभ असो की आघात , त्यामागे आपले कर्म असते.सर्वच कर्माची फळे तात्काळ मिळतात असे नव्हे, अनेकवेळा
आयुष्याच्या उत्तरार्धात ती मिळतात.आपल्या वाट्याला तेच येते ,ज्याची आपण वाट तयार
केलेली असते.आपल्याच बऱ्या वाईट कर्माची कडू गोड फळे आपण भोगत असतो.दोन्ही
फळांची अपेक्षा बाळगणे गरजेचे नसते.कर्म आणि फळ विधिलिखित असते.त्यातून कुणाचीही सूटका नसते.कर्माच्या बाबतीत मनुष्य बेफिकीर असेल तर त्याचे दुष्परिणाम तितकेच भयंकर असतात.
केवळ कर्म महत्त्वाचे नसते त्यामागील अधिष्ठानही तितकेच महत्त्वाचे असते.आपल्या वाट्याला आलेल्या दु:खास आपण इतरांना दोषी मानतो.ते सर्वथा चूकीचे असते.आपण स्वत: केलेल्या चूका आपणास
दिसत नाहीत,आपण त्या विसरतो किंवा त्यावर पांघरुण घालतो ,नाकारतो.तरीही त्याचे फळ आपणास भोगणे अपरिहार्य असते.
आपल्या प्रत्येक वागण्याचे आपणास फळ मिळत असते.मनुष्य आपले भाग्य स्वत: लिहित असतो.कोऱ्या कागदाप्रमाणे जीवन असते,त्यावर कर्माच्या लेखनीने लिहायचे असते.
              
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.