- ना.रा.खराद
आपल्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तू आपल्या अभिन्न अंग बनलेल्या असतात.त्यांचा वापर नकळत एखाद्या अवयवाप्रमाणे होतो.गरजेतून या वस्तू निर्माण होत गेल्या.कित्येक वस्तू कालबाह्य झाल्या असल्या तरी अजूनही कित्येक वस्तू आपले अस्तित्व टिकवून आहेत.
पैकी 'काठी' चे स्थान सर्वोच्च आहे.
काठी,सहज उपलब्ध होणारी वस्तू आहे.घराघरात 🏡 घरातील सदस्यांपैकी ती असते.अनेक घरात अनेक काठ्या असतात.काठ्यांचे आकार गरजेप्रमाणे असतात किंवा आकारानुसार वापर केला जातो.
शेतात जातांना हातात काठी असावी लागते.स्वरक्षणाचे इतके अमोघ शस्त्र दूसरे नाही.हातात काठी असेल तर जंगली प्राणी जवळ येत नाहीत.सांप,विंचू वगैरे याची भीती राहत नाही.
वृद्धांना आधार देणारी काठी साधी असू शकत नाही.
🤠 गुराखी , मेंढपाळ काठीशिवाय नसतात.काठी आणि...उगीच नाही म्हणत!
भांडणामध्ये काठ्यांचा शस्त्र म्हणून वापर होतो.काठी फिरविणे हा एक खेळाचा प्रकार असतो.
महात्मा गांधीची काठी तर जगविख्यात आहे.गुरांना हाकलण्यासाठी काठीचाच वापर होतो.
शिक्षकांच्या हातातील 'छडी' हाही काठीचाच प्रकार.वाटल्यास काठीचे बाळ म्हणा.या काठीने कित्येक
पिढ्या घडवल्या आहेत.
काठी सरळ,मऊ,दनकट असते.विश्वसनीय असते.मोडेल पण वाकणार नाही,अशा बाण्याची असते.कावडवाले काठीच्या साह्याने आपले भांडे उचलतात.गुढी काठीच्या
आधाराने उभी राहते.काठ्यांना सजवले जाते.कोणत्या झाडांची काठी यावरुन तीचे मोल ठरते.काही काठ्या खुप टिकाऊ असतात.पिढ्यांची ओळख असतात.हिंदीमध्ये ',जिसकी लाठी ,उसकी भैंस' काठीचा महिमा सांगते.सांप मरे और लाठी भी न टूटे,हा महिमा वेगळाच!
काठी पाण्यात बूडत नाही,उलट बुडणाऱ्याला वाचवते.
काठीयुद्धही असते.भांडणातील काठ्या पुरावा म्हणून
पोलिस जप्त करतात. पोलिसांकडे काठी हेच प्रमुख शस्त्र असते.आदळ आपट करणे त्यामुळे सोपे जाते.
' लाठीचार्ज ' होतो.लाठ्याकाठ्या खाऊन अनेक आंदोलने यशस्वी होतात.गावात तर काठीवरुन माणसे ओळखली जातात.
अनेक रोपांना काठीचा आधार दिला जातो.वेली तर काठीच्या आधाराने भरारी घेतात.काठी हाडांसारखी मजबूत असते.ती बाह्य कृत्रिम हाडेच होत.
काठी जन्माची सोबती तर आहेच.मृत्युनंतरही आपले ओझे ती वाहते.