मला आठवते तुझ्या जन्माची वेळ.
'मुलगी झाली.' म्हणत
कित्येकांनी नाके मुरडली होती आणि
गंमत अशी की त्यामध्ये स्रियाच जास्त होत्या
माझ्याकडे सर्वजन हीनतेने बघत होते
मलाही थोडा वेळ हीन भावनेने ग्रासले होते
पण खरे सांगतो,
मी जेव्हा तुला आईच्या कुशीत बघितले
तेव्हा तु मला साक्षात ईश्वरस्वरूपातच दिसली
तुझे ते दैवीरुप बघून
बाप असल्याचा अभिमान वाटू लागला
मी मिठाई घेऊन वाटत होतो ,
प्रत्येक जन "मुलगा झाला वाटतं"
असच म्हणत होता ,
तेव्हा मात्र मुलगी का नको असावी
याचा मी विचार करत होतो
प्रत्येकाची आई कधीतरी मुलगीच होती
मग स्वतः ची मुलगी का नसावी
लग्नासाठी मुलगी शोधत फिरणारे
मुलगी नको कोण्या तोंडाने म्हणतात
हे कोडे मला अद्याप उलगडले नाही
पण तु वाईट वाटू देऊ नको
'मी मुलगी आहे' असा विचार करत खचू नको
आईचा गोडवा गाणारा पत्नीसाठी वेडापिसा होणारा समाज स्वतः ची मुलगी नको म्हणतो
असे का ,ह्याचा तु विचार कर
मीही तोच विचार करतो
आयुष्यभर आपल्या कुटुंबाचे
ओझे वाहणारी मुलगी
ओझे का वाटावी
तरुण मूलीला बघून जिभल्या चाटणारी मुले ,
आपल्याला बहिण आहे हे
दबक्या आवाजात सांगतात तेव्हा
मानवजातीचा दांभिक चेहरा
डोळ्यासमोर येतो
मुली तु जननी आहेस
तुझ्यासारख्या असंख्य
मातांनी हा मानवसमाज
घडवला आहे
मानव जातीचा वारसा
जपणारी स्री आहे
तीला कमी लेखणे मूर्खपणाचे आहे
स्त्री निसर्गाची किमया आहे
तीस इतके सुडौल,कोमल बनवले
ते का उगीच!
स्रीचे स्मित पुरुषांना घायाळ करते
स्रिविना स्मशान झाले असते सर्व
पुरुषांची बरोबरी करण्याची तुला
गरज नाही
तु केव्हाच पुरुषांपेक्षा मोलाची आहेस
एक बाप जानतो ,
मुलगी असल्याचे सुख काय असते,
मी स्वतः ला भाग्यवान समजतो
की तुझ्यासारखी गुणी मुलगी आहे
मुली तु आनंदी असावे
बाप म्हणून मी तुझ्या कायम
पाठिशी आहे.