भांडी. - ना.रा.खराद

                   भांडी.                 - ना.रा.खराद

              

  प्रत्येकाच्या घरात विविध प्रकारची वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेली लहान मोठी भांडी असतात.ती असावी लागतात.गरज आणि ऐपत बघून ती खरेदी केली जातात.काही भांडी रोजच्या वापरात असतात तर काही केवळ काही प्रसंगी.
अनेक भांडी विस्तवावर ठेवली जातात, आपल्यासाठी जळतात.काही भांडी डोक्यावर घेतली जातात.भांड्याची स्वतंत्र दुकानं असतात.लग्नामध्ये भांडी दिली जातात, यावरून भांड्याचा महिमा किती अगाध आहे, हे लक्षात येते.काही भांडी घरातील विशिष्ट सदस्यांची असतात, इतरांना ती वापरता येत नाही.
अनेक भांडी विशिष्ट वापरासाठी असतात.दूधाची कैन,
चहाची बसी,पाण्याचा तांब्या,तेलाची कुपी वगैरे.मातीची, तांब्याची, पितळी अशी विविध धातूंची भांडी आपले घर समृद्ध बनवतात.
भांडी कुटुंबातीलच वाटायला लागतात.पूर्वी
काही मोठी भांडी ठराविक लोकांकडेचअसायची.
गरजपडेलतेव्हामागायची.खेडेगावात तर कोणते भांडे कुणाचेआहे ,हे लगेच ओळखले जायचे.
कुटुंबामध्ये बायांना भांडी घासणे  हे नित्य काम असते.
शेजारी भाजी देण्याघेण्यात छोटीमोठी भांडी वाटी,चमचे वगैरे अदलाबदल होतात.रोजच्या वापरातील भांडी रोज किंवा वारंवार स्वच्छ करावी लागतात,भांडी स्वच्छ करणे
गृहिणीसाठी एक प्रमुख काम असते.भांडी जिथल्या तिथे ठेवणं एक कसब असते.
नोकरानी असेल तर भांडीवाली म्हंटले जाते.
नोकर असून राणी का म्हणत असावेत ह्याचा
अद्याप उलगडा नाही.याभांड्यावरुन ,"भांड्याला भांडे लागणे' हा वाकप्रचार उदयास आलाअसावा.भांड्यावरुन बायकांमध्ये भांडणे होतात म्हणून देखील त्यास भांडी म्हणत असावेत.पूर्वी भांड्यावर नाव कोरलेले असायचे.एखादा शिलालेख असल्यासम त्याचे अस्तित्व असायचे.लग्नामध्ये भेट म्हणून भांडी दिली जायची.संसारपयोगी साहित्य दिले जायचे.पेल्यापासून चमचापर्यंत सर्वकाही त्यामध्ये असायचे.लग्नात आलेली
भांडी प्रतिष्ठा असायची.लग्नात आलेल्या भांड्यांचे मोठे कुतूहल असायचे.लग्नानंतर अनेक वर्षे टिकलेली भांडी आठवणीत घेऊन जायची.
वाटणीमध्ये भांडीही वाटली जायची.नेहमी सोबतीला असलेले ग्लास वेगळे केले जायचे.
एकमेकांत मिसळलेले चमचे वाट्या वेगळ्या
केल्या जायचे.घरातील काही भांडी काही पिढ्यांची असतात.त्यांचा एक वेगळाच रुबाब असतो.हे भांडे माझ्या अमूकने आणलेले आहे असे म्हणतांना डोळ्यांच्या कडा किंचितओल्या व्हायच्या.
घरामध्ये शिल्प्यावर भांडी लावण्याचे एक कसब असते.स्वच्छ धूतलेली आणि आकाराप्रमाणे व्यवस्थित लावलेली भांडी बघितली की,'घराची कळा भांडी दाखवतात.'असं म्हणण्याचा मोह होतो.भांड्याचे आकार
प्रकार खुप असतात.गृहणींना त्याच्या वापराचे योग्य ज्ञान असते.
स्वयंपाकघर हे मांडण्याचे मुख्य निवासस्थान असते, रोजच्या वापरातील भांडी तिथे मदतीला असतात.भांडी बोलत नसली तरी आवाज नक्की करत असतात, प्रत्येक भांड्यांचा एक नाद त्या घरात घुमत असतो, अंगवळणी पडलेला असतो.
एकसारखी भांडी ,उदा.ताट.वाट्या, ग्लास एकमेकांसोबत असतात.एकसारखी भांडी परंतु एकमेकांना सामावून घेतात.
भांड्यांची आदळ आपट एक सांकेतिक भाषा असते, विवाहित पुरुषांना ती अवगत असते.काही ठिकाणी भांडी फेकून मारण्याचे प्रकार घडतात.
भांड्यांचा आवाज देखील होत राहतो,तसा तो केलाही जातो.राग व्यक्त करण्यासाठीभांड्यांची आदळआपट केली जाते.कधीकधी मांजर भांडी खाली पाडतात.रागाने लहान मुले भांडी इकडे तिकडे फेकतात.काही भांडी विशेष प्रसंगी काढली जातात.
भांडी संन्यासाला देखील हवी असतात.पळीभर तेल पळीशिवाय काढता येत नाही.गरम कढई चिमट्याशिवाय उचलता येत नाही.चमच्या शिवाय शिरा तोंडात शिरत
नाही.भांड्याचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे.
                        
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.