निवड

                                                  निवड
                                                        - ना.रा.खराद
आयुष्यभर प्रत्येकजन निवड करत असतो.निवडीचे स्वातंत्र्य प्रत्येकास हवे असते.अगदी लहान सहान बाबींची देखील निवड करण्याची आपणास आवड असते. एकसारख्या वस्तूंमधून शुद्धा आपण निवड करतो.निवडीचा एक वेगळाच आनंद आणि सुख असते. "माझ्या आवडीची साडी घेतली."
भले ती साधी असो परंतु निवडण्याचे स्वातंत्र्य फार सुखावते.
लग्नासाठी मुलगी बघण्याची जी प्रथा आहे ती याच मानसिकतून निर्माण झाली असावी.
मुलाला मुलगी निवडण्याचे स्वातंत्र्य दिले की पुढे झंझट राहत नाही. नसता त्याने म्हणायचे,"तुम्हीच माझ्या गळ्यात धोंड बांधली." 
लहान मुले देखील कपडे खरेदी करतांना आवडीचे कपडे घ्यावयास लावतात. बाजारात भाजी घेतांना सगळा बाजार आपण पालथा घालतो,तेव्हा कुढे आपली पिशवी भरते.पेन खरेदी करतांना आपण त्याचा रंग निवडतो.एवढेच काय अगोदर दुकान निवडतो.आंबे निवडून आणले तरी अर्धे सडके निघतात. बायको निवडून केलेली असते तरी आयुष्यभर पश्चाताप करतात.
साडी निवडणे हा एक महायज्ञ असतो.दुकानातील साड्यांचा ढिग आणि त्यातून एक साडी! कोणतीही निवडली तरी
उरलेल्या साड्यांना विसरणे सोपे नसते.मुलांसाठी शाळा निवडली जाते.पदवीला विषय निवडले जातात. निवडणूकीत उमेदवार निवडला जातो. बोरे,जांभळं निवडून घेतले जातात. डावलेल्या सर्व वस्तू
निवडणारे कुणीतरी असतेच!
चपलेच्या दुकानात चप्पल निवड हे एक आवाहन असते. पाय घालून बघितला जातो.
जोड निवडायचा असतो.तो विजोड असू नये, याची काळजी घेतली जाते.
अनेक ठिकाणी निवडीचे स्वातंत्र्य असले तरी पर्याय नसतो.अपरिहार्य असते. निवडीची आवड असली, तसे स्वातंत्र्य असले तरी आपली लायकी,योग्यता बघणे गरजेचे असते.क्षमता बघून निवड करणे हा विवेक लागतो.
लहान मुले पैशाचा विचार न करता ,महागडी वस्तू निवडते.त्यास समज नसते.
डब्यातील लड्डू आपण निवडून घेतो.वरची चपाती आपणास नको असते. निवडीचे सुख
त्याने मिळत नाही. चिठ्ठी काढतांना देखील आपल्या नावाची चिठ्ठी वर ठेवली तरी आपण
ती उचलत नाही. खालीवर हात घातल्याविना आपणास चैन पडत नाही.
आपण निवडतो तसे आपलीही निवड होते.
एखाद्या कामासाठी आपली निवड होते. क्रिकेट संघात निवड झाली किंवा पुरस्कारासाठी निवड झाली की आनंद होतो. एखाद्या पदावर निवड झाली किंवा लोकांनी निवडून दिले की सुख मिळते.निवडीचा हा फार मोठा पसारा आहे. काही असले तरी निवडण्याचे आणि निवडल्याचे सुख आपणास लाभते. दोन्ही चुकीचे असले तरीही!
       
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.