नालायक औलादी

              नालायक औलादी
हल्ली घराघरांतून एकच ऐकायला मिळते की , मुले बिघडली आहेत,आमचे काही ऐकत नाहीत,ती स्वच्छंदी,विलासी,आळसी , बेपर्वा बनली आहेत, त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव नाही,अतीलाडाने ती पार कोलमडून गेली आहेत.आपल्या कर्तव्यात तसूभरही कमी न पडलेल्या आईवडिलांना ते पार विसरून गेले आहेत,त्यांचेही काही दुःख असू शकते,असे त्यांना मुळीच
वाटत नाही.आई आजारी असताना आपण घरकामात तीला काही मदत केली पाहिजे,असे ज्या मुलीला वाटत नाही,ती मुलगी कोणत्या जगात वावरते हे कळायला मार्ग नाही.बापाच्या खांद्यावरचे ओझे जो तरुण मुलगा आपल्या खांद्यावर घेत नाही,तो काय मुलगा म्हणायच्या लायकीचा असतो.करमणुकीच्या साधनांमध्ये गर्क झालेली पीढी, शेजारी तापाने फनफनत असलेल्या आईबापाकडे ढूंकून बघत नसतील तर आपण कोणत्या वळणावर येऊन ठेपलो आहोत,ह्याचा विचार होणे गरजेचे आहे.
आईवडिलांचा अनादर करणे, त्यांना उलटून बोलणे, त्यांच्या त्यागाचे ,प्रेमाचे मोल न करणे आजच्या काळात सर्रास दिसून येत आहे.मोकाट 🐕 कुत्रा ज्याप्रमाणे हवं तिकडं भटकंती करतो,तशी अवस्था या मुलांची होत आहे.बाप मुलांमधील तणाव, बेबनाव आजच्या युगातील
जळजळीत सत्य आहे.मुलांच्या इच्छेविरुद्ध साधी गोष्ट देखील करण्याची सोय आता उरली नाही.कुटुंबप्रमुख
हा शब्द काळाच्या पडद्याआड गेला आहे.
बाप आणि मुलगा एकमेकांचे वैरी असल्यासारखे वागत आहेत.दोहोमधील संवाद संपुष्टात आला आहे.आजची मुले शिकली आहेत, दोन पैसे कमावू लागली आहेत, म्हणून त्यांनी असे बेताल वागावे का? 
बहुतेक घरांमध्ये हेच चित्र आहे, परंतु घरचं चव्हाट्यावर का आणायचे म्हणून माणसे गप्प आहेत, परंतु कधीतरी
ते चव्हाट्यावर येणार आहे.मुलांच्या सर्व मागण्या बापाने
पूर्ण केल्याचे पाहिजे,मग त्याची कुवत असो वा नसो.
आपल्या मुलांचे हित कशात आहे, बापाला माहित असते, म्हणून तो त्याचा खरा मित्र असतो, परंतु बाप जुनाट विचारांचा आहे, त्यांना काही कळत नाही,अशी या
पिढीची गत झाली आहे.
ज्या बेफिकिरीने आजची पिढी वागत आहे,त्याचे अत्यंत कटू फळ त्यांनाच चाखावे लागणार आहे, आपल्या नतभ्रष्टपणाचा पूरा हिशोब त्यांना चुकवावा लागणार आहे, फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे.पिठाच्या
गिरणीत देखील बाप जातो.भाजीपाला आणणें शुद्धा मुलांना जमत नसेल तर कुठे चालली पिढी?
आज बापाजवळ थांबण्याची तसदी मुले घेत नाहीत, त्यांना बाप नाही तर त्या बापाचे फक्त पैसे हवे असतात.
चंगळवादी पिढी बापाच्या घामाचे आणि अश्रूंचे मोल कधीच करु शकत नाही, बापाच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या औलादी म्हणजे नात्याला कलंक आहे.
धनदांडगे आणि मध्यमवर्गीय मुले बिघडली आहेत, याउलट कष्टकरी, मजूर, कामगार यांची मुले अत्यंत मेहनती, कर्तव्यदक्ष आहेत.आपल्या कुटुंबाला हातभार लावताना दिसतात.नाते जपणारी व काळजी घेणारी असतात.कौटुंबिक प्रेम इथे जास्त आढळते.
बापाच्या पैशावर मजा मारणारी , त्याच्या कष्टाची जाणीव नसणारी, ऐतखाऊ पिढी बघितली की रक्त खवळते.
शिक्षणाचा उपयोग फक्त पैसा मिळवायचा प्रयत्न असेल तर हे असेच घडणारच.माणुस घडवणारे शिक्षण,काळाची गरज आहे.मुलांचे फाजिल लाड व त्यांची अतीकाळजी यामुळे मुले निष्क्रिय बनली आहेत, त्यांच्यावर देखील काही जवाबदारी टाकून बघितली पाहिजे,नसता ती कोलमडून पडतील.प्रेमाचा करा अर्थ हाच आहे की मुले स्वतः उभी राहिली पाहिजेत,चालली पाहिजेत,धावली पाहिजेत.तो सुखाचा क्षण प्रत्येक आईबापांच्या वाट्याला यावा एवढीच हार्दिक इच्छा आहे 🙏
अपवाद असणाऱ्या मुलांना शुभेच्छा!
                                          - ना.रा.खराद,अंबड
                                 8805871976
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.