रस्ते

                    रस्ते
                        - ना.रा.खराद
आपण जीवनभर ज्यावरुन प्रवास करतो ते रस्ते म्हणजेच आपले जीवन होय.अनेक वाटा पादाक्रांत केलेले पादचारी आहोत आपण.
या पाऊलवाटा, आपल्या पाऊलखुणा सोडून जातात.पक्की सडक असो वा कच्ची.पाणंद
रस्ता असो की महामार्ग,हे जीवनाचे वळण आहे.असलेल्या वाटेवरून आयुष्य चालते.
रस्त्यांना लांबी,रुंदी असते.काही रस्त्यांना इतिहास देखील असतो.मार्ग हे रस्त्याचेच टोपणनाव.मार्गांनाही दर्जा असतो.राज्य, राष्ट्रीय अशी ओळख असते.देशभर फिरण्याची मजा या रस्त्यांमुळेच.रस्ते सरळ असतात तसे वळणाचेही असतात.काहींचे आयुष्य रस्त्यावर जाते.आपल्या मागण्यांसाठी लोक रस्त्यावर उतरतात. रस्ता अडवला जातो.काही मार्ग वाममार्ग असतात.
सन्मार्गही असतो.अनेकांचा शेवट रस्त्यावर होतो.रस्ता चूकला की हेलपाटे होतात.
रस्त्यासाठी भांडणे होतात.रस्त्यावर भांडणे होतात. वाट हेही त्याचेच नाव.वाट असल्याशिवाय विल्हेवाट लावता येत नाही.
वाटेवर वाट बघितली जाते.आपण सर्व वाटसरू आहोत.काही लोक वाटमारी करतात,वाटाडे असतात.बापाची घरी येण्याची मुलगा वाट बघतो.जीवनाच्या अनेक वाटा आहेत.प्राणी आपल्या वाटेने जातात.
कुणी कुणाच्या वाटेला जाऊ नये,म्हणतात.अनेकांनी वाट लावलेली असते.काही वाटा काटेरी असतात.कुणाच्या वाटेवर फूल अंथरलेले असतात.
रस्ता,मार्ग,वाट आपल्या जीवनवाहिनी असतात.प्रत्येक रस्त्यावर जाणे शक्य नसते.
अनेक मार्ग आपणास मार्गी लावतात.कुठलाही मार्ग नसला की मनुष्य अगतिक होऊन जागेवर थांबतो.रस्त्यावरच्या भेटी कधी आयुष्याची सोबत करतात.हिंदीमध्ये' हमराही' फार छान शब्द आहे.सुनसान रस्त्यावर भीती वाटते.वर्दळीचे रस्ते जीवनाचा वेग दाखवतात.
अनेकांचे पोट रस्त्यावर असते.चालक तर रस्त्याशी एकरुपच होतो.रस्तेही माहिती असावे लागतात.खाचखळगे ठाऊक हवेत.
एकटं असलं तरी रस्ते सोबतीला असतात.
मार्ग सरळ असेल तर सुकर होतो.आडवाटा
जोखमीच्या असतात.नको त्या वाटेने गेले की
वाट चूकली असेच वाटते.
शेतरस्ते शेतकऱ्यांच्या ओळखीचे असतात.
ओढेनाले ओलांडून जाताना एक वेगळाच आनंद मिळतो.नागमोडी पाऊलवाटा गावची
ओळख असते.दोहो बाजुंनी पिकांचा डौल , मधून चालतांना चढणारा कैफ ज्यास लाभला
तो किती भाग्यवान.
काही वाटा गुप्त असतात.मोजक्या लोकांनाच
ठाऊक असतात.मार्ग दाखवतात त्यांना मार्गदर्शक म्हणतात.
रस्ते जागा सोडत नाहीत, वाटसरुंचे ते साक्षीदार असतात.ध्येयावर पोहचले की मार्ग
आठवतो.महामार्ग असो वा पाऊलवाटा आपल्या जीवनाचा प्रवास अव्याहतपणे चालू 
असतो.कोणत्या वळणावर कोण भेटेल सांगता येत नाही.जपून चालले तरी धोका टळत नसतो.फक्त रस्त्याच जाणतो ,आपलाप्रवास कुठवर आहे ‌. 
                          
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.