बोटे

                                      बोटे
बोटे हाताची असोत की पायांची , त्याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटत आलेले आहे.मी बालवयात बोटांसी खेळायचो.पण कधीकधी त्याविषयी गंभीर व्हायचो.बोटांची हालचाल मला आश्चर्यजनक वाटायची 
त्याचबरोबर त्यांचा आकार मला रहस्यमय वाटायचा.बोटांचा वापर आपण किती मोठ्या प्रमाणात करतो परंतु त्याविषयी कधी विचार करत नाही.एखाद्या वेळी बोटास इजा झाली की मग त्याचे अस्तित्व कळते.
आपण जे काही करतो ते बहुतेक बोटांनीच.अनेक संकेत देखील बोटांनीच केले जातात.बोट लावीन तिथे गुदगुल्या
होतात.
प्रत्येक बोट महत्वाचे असते.अंगठे बहाद्दर उगीच नाही म्हणत.मतदान केले की बोटाला शाई लावतात.अडाणी
माणसे सही ऐवजी अंगठ्याचे ठसे द्यायचे.शाळेत मुले लघवीला जायचे असेल तर करंगळी दाखवतात.केवळ
बोटांच्या संकेतांचे अनेक घडामोडी घडतात.आधार कार्ड देखील बोटांच्या आधारे बनते.बोटांचा लहान मोठा आकार फारच उपयुक्त आहे.कंम्प्युटर, मोबाईलचा वापर बोटाने होतो.नोटा बोटाने मोजल्या जातात.बोटांची सांकेतिक भाषा देखील आहे.कुणाकडे बोट दाखवले की काय घडते आपणास ठाऊक आहेच.
कुठे खाज सुटली की बोट धाव घेते.चिमटा तर बोटाची खोडी.जेवणासाठी बोटांचा उपयोग.बोटं चाटली जातात,किती ती प्रिय.लहान मुलांचे बोट आजोबा धरुन चालतात.बुटाचे बंद बांधणे असो वा सुईने शिवणकाम असो बोटांशिवाय नाही.वाहनांची चावी लावणे असो की हार्न वाजवणे असो सर्व बोटांचा खेळ.
संगीत क्षेत्रात तर बोटांचा अमाप वापर.हारमोनियम वीणा वगैरे बोटांचे कौशल्य.पेन बोटात पकडून लिहिले
जाते.प्रत्येक बोट जसे स्वतंत्र कार्य करते तसेच सर्व एकत्र येऊन वेगळ्या पद्धतीने काम करतात.जिथे ज्या बोटाची
गरज तिथे ते वापरले जाते.अंघोळ बोटांच्या मदतीने साधली जाते.बोट कितीही अडचणीत घुसू शकते.
बोट इतर अवयवांच्या मदतीस तत्पर असते.बोट शरीराच्या कोणत्याही भागावर पोहचते.अनेक कला बोटांच्या आश्रयाने राहतात.निवडून आलेला उमेदवार बोटं दाखवतो.कानातला मळ,नाकातला द्रव बोटांनी
काढला जातो.
बोटांचे यापेक्षा खूप जास्त उपयोग आहेत.उपयोगी अवयव उपेक्षित राहू नये एवढाच सदहेतू !
                 -  ना.रा.खराद
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.