माणसांशिवाय...

                  माणसांशिवाय...
                               - ना.रा.खराद
माणसांशिवाय या जगात लक्षावधी प्रकारचे जीव आहेत. रंगाने,आकाराने लहान मोठे. हिंसक अहिंसक.शाकाहारी मांसाहारी वगैरे.अनेक पाळीव आहेत.माणसाच्या सहवासात राहतात. निरुपद्रवी असतात. काही जीव माणसापासून दूर राहतात. बरेचसे लपूनछपून राहतात, चकवतात.ससा ,मांजर ,पाल वगैरे फार भित्रे असतात. साप,विंचू असले आपल्या जगात वावरत असतात. काही जीव हवेत,काही पाण्यात,घरात,फळात,फूलात सर्वत्र आढळतात. काही इतके सुक्ष्म असतात की डोळ्यांना दिसत नाहीत.आकाराने मोठे ,महाकाय प्राणीही खुप आहेत. अनेक प्राण्यांचा उपयोग मनुष्य करतो.घोडे,गाय ,
सरपटणारे,उड्या मारणारे एक ना अनेक रंगाचे ढंगाचे जीव असतात.घोडे, ,ऊंट,हत्ती हे राजेशाही थाटातले प्राणी.गाढवांचाही उपयोग आहे. निरुपद्रवी प्राणी.डूक्कर तर.स्वच्छता अभियानच राबवते.कुत्रे तर माणसासोबतच वावरते.संगतीचा परिणाम दिसतोच.डासासारखे कीडे फार त्रासदायक .पण तोही जीव आहे.रात्री वावरणारेही काही जीव असतात. घुबडांना तर रात्रीच दिसते.काजवा आपला उजेड पाडतो.कोल्हेही ओरडतात.काही जीव चपळ तर काही संथ गतीचे असतात. समानता फक्त
प्राणात असते,प्राण्यात नाही.आपआपल्या विश्वात सर्व जीव रममाण असतात,त्यांचे आपले एक वेगळे विश्व असते.आपल्या मर्यादेत राहून ते जगतात.काही निरुपद्रवी जीवांशी त्यांचे सौख्य असते.
मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे,असे मनुष्यानेच घोषित केले आहे.हे खरे मानण्याचे कारण नाही.इथे प्रत्येक जीव
श्रेष्ठ आहे. 
विविध प्राणी,पक्षी,कीडे यामुळे हे विश्व समृद्ध झाले आहे. माणसाशिवाय या सृष्टीत अनेक जे जीव आहे.ते आपले सोबती आहेत.त्याच्यांशी आपले सौख्य असले पाहिजे.आपल्या भोवतालच्या सृष्टीला न्याहाळले पाहिजे.
सौहार्द असले पाहिजे.अधिक एकरुप होता आले पाहिजे. फक्त माणसांच्या गर्तेत हरवून जाणे अनाठायी आहे.
  माणसाशिवाय असलेल्या या अफाट पसाऱ्याकडे बघण्याची विशाल दृष्टि आपण मिळवली पाहिजे.आपण
अधिक व्यापक व्हावे,आपले मानवपण कायम ठेवत ,मानसाशिवाय असलेल्या जगाशी नाळ जोडावी तेव्हाच तेव्हाच आपण देखील विश्वरुप होवू.
 
 
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.