हुकुमशाही
- ना.रा.खराद
हुकुमशाही एक शासन व्यवस्था आहे, त्याचबरोबर ती मानवी प्रवृत्ती देखील आहे.
मी आठव्या इयत्तेत शिकत असताना , मराठी विषयाच्या शिक्षकाने पंधरा निबंध लिहून आणा,
असा हुकूम सोडला.कुणीही इतके निबंध लिहू
शकले नाही.सर्व विद्यार्थी उभे राहिले.शिक्षकाने
प्रत्येक विद्यार्थ्याला पंधरा छड्या मारल्या.
दूसऱ्या एका शिक्षकाने त्याच दिवशी फक्त एक निबंध लिहून आणायला सांगितला होता पुन्हा
ज्यांना शक्य नसेल त्यांना मी परत समजावून सांगेल असे म्हटले होते.ते शिक्षक स्वतः उत्तम
असा निबंध लिहित असत.सर्व मुलांनी मोठ्या
आनंदाने कुवतीनुसार निबंध लिहून आणला.
हुकुमशाहीची प्रवृत्ती इतकी सुक्ष्म आहे की ती
लवकर लक्षात येत नाही.माणसाच्या आचरणातून ती आढळते आणि गंमत म्हणजे आपण हुकुमशाही प्रवृत्तीचे आहोत हे संबंधित व्यक्तीच्या लक्षात देखील येत नाही.
इतरांचे ऐकून न घेण्याची, इतरांना समजून न घेण्याची प्रवृत्ती अशा लोकांमध्ये असते.
सत्ता आणि अधिकार यामुळे या प्रवृत्ती उफाळून
येतात.जन्मापासून आपल्यावर या प्रवृत्ती अधिकार गाजवू पाहतात.पुढे तर कायमच हेअनुभवायला मिळते.
पूर्वी जसे राजेशाही होती,'राजा बोले दल हले'
असे वाक्प्रचार उदयास आले.राजाचा हुकुम
म्हटलं की कुणी काही बोलायचे नाही.
लोकशाही मध्ये शुद्धा हुकुमशाहीच आहे.लोकांच्या हुकुमाने प्रतिनिधी निवडले जातात आणि पुढे तेच प्रतिनिधी हुकुम गाजवितात.
अधिकारातील आणि सत्तेतील माणसे आपल्या
पद्धतीने वागतात.मनमानी करतात,छळ करतात, अडवणूक करतात आणि तो माझाअधिकार आहे ,अशी मुजोरी करतात.
मी म्हणतो,मी सांगतो ,मला असे हवे , तसे हवे
सर्व नियम,कायदे धाब्यावर बसवून स्वतःच्या
लहरीपणाने कार्य करतात.
जागोजागी असे हुकुमशहा बसलेले आहेत.प्रश्न
करायचे नाहीत,कारणे विचारायचे नाहीत,असली मुस्कटदाबी अशा प्रवृत्तींचे लोक
करतात.
हुकुमशाहीसाठी फार मोठी सत्ता असावी लागते
असे नाही.त्यासाठी फक्त शिक्षक असले तरी चालते.लहानलहान मुलांचा अतोनात छळ आजवर अनेक शिक्षकांनी या देशात केला आहे.
पोलिस खात्यात कित्येक पोलिस अधिकारी हुकुमशाही प्रवृत्तीचे असतात.अधिकारावर जर
या प्रवृत्तीचे लोक असतील तर सामान्य माणूस
पिळला जातो, भरडला जातो.गुन्हेगार नसलेले
लोकच पोलिसांना जास्त भितात यामागचे कारण हेच असावे.
मी म्हणतो तेच खरे, माझ्यापुढे कुणी बोलायचे नाही ही प्रवृत्ती हुकुमशाही प्रवृत्ती आहे.अधिकाराच्या नावाखाली तिचा अवलंब होतो तो वरकरणी दिसत नसला तरी तो त्या व्यक्तीमध्ये नक्कीच असतो.
चूकीची कामे करायला लावणे, वेळी अवेळी काम सांगणे ,वेठीस धरणे हे सर्व छळाचे प्रकार आहेत.
हुकुमशाही केवळ तलवारीच्या जोरावर चालते
असे नव्हे, आता लोकशाहीमध्ये ती कलम म्हणजे लेखनीच्या जोरावर चालली आहे.माझे
ऐकणार नसेल तर मी अमूक करेल तमूक करेल
धमकी देणे हिच हुकुमशाही प्रवृत्ती आहे.
'सत्य काहीही असो,मला घेणेदेणे नाही' असला
उर्मटपणा या लोकांमध्ये असतो.
कुटुंबात देखील हुकुमशाही प्रवृत्तीची माणसे असतात.कुणाचेही ऐकत नाहीत.मी म्हणतो ,बस.
हुकुमशाही एक मानवी प्रवृत्ती आहे,या प्रवृत्तीची
माणसे जिथे कुठे असतील त्यांच्या विरुद्ध
आवाज उठवला पाहिजे.लोकशाहीमध्ये हुकुमशाही समूळ नष्ट व्हावी व खरी लोकशाही
नांदावी यासाठी हा लेख.
हुकुमशाही प्रवृत्ती सोडून सनदशीर मार्गाने कार्य
करावे, पिळवणूक आणि छळवणूक करु नये.
अधिकाराचा व सत्तेचा माज असू नये.योग्य पद्धतीने, न्यायाने सर्व कार्य व्हावे ,अशी अपेक्षा
व्यक्त करतो .