अति

                  
                      अति
                             - ना.रा.खराद
 मराठीमध्ये'अति तिथे माती' अशी एक प्रसिद्ध म्हण आहे आणि ती तंतोतंत खरी आहे.सर्वच भाषेमध्ये अशा अर्थाची म्हण आहे.हा अनुभव बहुदा सर्वांनाच आलेलाअसावा.आपल्यापैकी सर्वच या अतिचे पाईक आहोत.आपले दोष आपण बघत नाहीत,ते इतरांना सांगावे लागतात.तरीही ते आपण मान्य करतोच असे नाही.आपल्या दोषांची चर्चा माघारी मात्र चांगलीच रंगलेली असते.जे अति असते ते ओंगळवाणे असते.ते इतरांना रुचत नाही.
 चांगलेही अति झाले की वाईट ठरते आणि वाईट प्रमाणात असेल तर चांगले ठरते.अति झाले की माती ठरलेली आहे.कौरवांनी सूईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन देण्यास नकार दिला म्हणून महाभारत घडले,नसता तडजोडीने प्रश्न सूटण्यासारखा होता.जेव्हा टोकाची भूमिका घेतली जाते ते टोक म्हणजे अति . कोणत्याही अतिपासून जो स्वत:ला दूर ठेवतो तो त्याच्या परिणामांपासून वाचतो.'अति झाले आणि हसू
आले.' उगीच नाही म्हणत.अंत्ययात्रेत कुणी अति रडत असेल तर ते हास्यास्पद ठरते.अति थाट केला की विदुषक वाटते.अति विलंब झाला तर खुप नुकसान होते.
अति घाई, उतावीळपणा अनेकांच्या अंगी असतो.याउलट अति संथपणा असतो.या दोहोंचा मध्य साधता आला पाहिजे.अति झोपणारे तसेच अति जागणारे असतात.परिणाम ठरलेला असतो.अति बडबड करणारे, अति मौन बाळगणारे दिसतात.अति वगळले की दोन्ही योग्यच असते.अति खाणे,अति उपवास त्याज्य आहे.
अति उधळपट्टी,अति काटकसर करणारे माणसे आपल्या अवतीभवती असतात.अति लोभ,अति त्याग उपयोगाचा नसतो. गुण असो वा दोष त्याचे संतुलन आवश्यक आहे.अतिपणाचे अजीर्ण हे केवळ खाण्यापूरते नसते.अति लाडाने मूल बिघडते.अति श्रम,अति आराम परिणाम सारखेच.
कोणत्याही गोष्टींची मजा थोडक्यात असते.अति वेगाने गाडी पळवली की अपघात ठरलेला असतो.अति बडबड केली लोक जवळ थांबत नाही.अति खाल्ले की अजीर्ण होते.मुलाचे अति लाड केले किंवा अति राग केला की मुल बिघडते.
अति कौतुक,प्रशंसा ढोंग भासते.अति लंपट कुठेही मार खातो.अति रागीट असणे कधीहीवाईटच.अति सरळ असले की गेले कामातून.अति थाट,अति गचाळ नकोसा होतो.अतिवर अति लिखाण नको.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.