आपल्याकडे असलेलं जे काही ते इतरांपर्यंत पोहचविण्याचे साधन म्हणजे पुस्तक.अगदी हजारों वर्षांपासून जगभर पुस्तकांचे हजारों प्रकाशने झाली आहेत.लेखक मेला तरी लिखाण जीवंत राहते.
अनेक संत कवी होते.त्यांचे ग्रंथ समाजाचे मार्गदर्शक ठरले.पुस्तके एका पीढीचे ज्ञान दुसऱ्या पीढीपर्यंत पोहचविते.अनेक ग्रंथ हे धार्मिक ग्रंथ मानले
जातात.त्याची पारायणे होतात.
पुस्तके सर्व प्रकारची असतात.वाचक आपल्या आवडीनुसार पुस्तकांची निवड करतात.अमुक पुस्तके वाचा असा सल्लाही दिला जातो.काही वाचक मिळेल ते पुस्तक वाचतात.आपण खुप वाचन करतो हा अंहकार ते बाळगून असतात.
काही फूकटे वाचक असतात.जे पुस्तक फूकटे मिळेल तेवढेच वाचायचे हा त्यांचा संकल्प असतो.
एकही पुस्तक न वाचता प्रत्येक पुस्तक आपण वाचल्याचे काही शिक्षित मंडळी सांगतात.काही वाचक व्यासंगी असतात.संपूर्ण आयुष्य वाचनात घालवतात.काहीचें वाचन हे प्रवासापुरते असते.बस किंवा रेल्वे असल्या सार्वजनिक ठिकाणी ग्रंथप्रदर्शन मांडतात.
मी अमुकच वाचतो.इतरांचे लिखाण मला आवडत नाही.मी वाचतो तेच वाचनिय आहे,असा त्यांचा अट्टाहास असतो.काही पुस्तके अल्पजीवी व अल्पमतिच्या लोकांनी लिहिलेली असतात . त्यांचाही त्या लायकीचा एक चाहता वर्ग असतो.आपणास आवडलेले पुस्तक इतरांना वाचण्याचा सल्ला दिला जातो.फक्त अमूकचे किंवा अमूकच पुस्तके वाचायची असा काहींचा
अट्टाहास असतो.कुणी तर मिळेल तेच पुस्तक वाचते.
खुप लोक वेळ घालविण्यासाठी वाचतात.थोडेसे वेळ काढून वाचणारेही असतात.काहींचे वाचन चौफेर,चौकस असते.
फक्त धार्मिक ग्रंथ वाचणारे वाचक असतात,तर काही लोक अश्लील किंवा गुन्हेगारी कथा वाचणारे असतात.ज्यास जे हवे तो ते वाचतो.इथे व्यक्तिस्वातंत्र्य असते.तुम्ही अमूक वाचा असे सल्ला दिला जातो.कुणी सामान्य ज्ञानाची किंवा क्रमिक पुस्तके वाचतात.वाचन छंद म्हणून जोपासला जातो.गरज ,आवड वगैरे असते.
काय वाचावे अनेकांना कळत नाही,तर काहींना काय वाचले हे कळत नाही.
संपूर्ण आयुष्य वाचनात खर्ची घालणारेही असतात.न वाचताही आपण वाचतो ,असे सांगणारे महाभाग असतात तर घरामध्ये शोभेसाठी पुस्तके साठविणारेही आढळतात.
अनेक वाचनालये सरकारी अनुदानासाठी
उघडले जातात.कित्येक वाचकांच्या कृपेने बंद पडलेली
असतात.कित्येक ग्रंथालये धूळ खात पडलेली असतात.
ग्रंथपाल नावाचा पालक मागितलेले पुस्तक नाही म्हणण्यासाठी असतो.
काही नावाजलेली पुस्तके कायम फिरतीवर असतात.ते परत करण्याची इच्छा होत नाही.खुप पुस्तकांची छपाई महागडी असते.एखाद्या राजकीय नेत्याचे त्याने न लिहिलेले चरित्र किंवा आत्मचरित्र यामध्ये मोडते.असली पुस्तके फूकट वाचायला मिळतात.
केवळ पुस्तक घेऊन फिरणारेही कमी नसतात.कुणी रद्दीत चांगले पुस्तक शोधतात.कुणाला चारचौघांत पुस्तकं वाचायची सवय असते.कुणी मोठ्याने वाचते.कुणी वाचता वाचता झोपते.कुणी झोपेसाठी वाचते.
वाचक आणि पुस्तक यांचे असे हे अतूट नाते