- ना.रा.खराद
अनेक पेय आहेत पण चहाची बरोबरी नाही.सर्वांच्या आवडीचे असल्याने बदनाम नाही.दिवसाची सुरुवात या पेयाने होते.पाहुणे आले की चहा.चहा न पाजल्याचे आणि पाजण्याचे बरे वाईट परिणाम आपण बघतोच.
अनेक नेते या चहातून घडतात.चहातून चाहते वाढतात.चहा पित गप्पा मारण्याचा एक वेगळा आनंद असतो.एकाच वेळी दोन आनंद.चहामुळे दिवसाची सुरुवात गरम होते.चहा खिशाला देखील परडवतो.
चहामुळे तो भिकाला लागला असं कुणी म्हणत नाही.अनोळखी माणसाची ओळख चहाने होते.घरात वरिष्ठांसमोर घेणे शक्य असते.
रात्री जागरण असेल तर चहा सोबतीला लागतो.चहाचा फुरका ज्याचा त्याचा वेगळा असतो.कुणी डोळे बंद करून चहा पितो तर कुणी डोळे मिचकावत.कुणी खुप वेगाने तर कुणी खुप सावकाश.कुणी खुप गरम तर कुणी थंड झाल्यावर.कुणी बशीत तर कुणी कपाने.
अनेक माणसे झोपेतून चहासाठी उठतात.अनेकांना तोंड चहासाठी धूत असतात असे वाटते. चहा उकळतांना त्याचा एक वेगळाच दर्प असतो.तो उकळेपर्यंत देखील एक उत्सुकता असते.नित्य पिऊन देखील कंटाळवाणे वाटत नाही.काही व्यक्ति मात्र आपण चहा पीत नाहीत असे अभिमानाने सांगतात.त्याची कारणेही न
विचारता सांगतात.मी सकाळी एक कप
चहा घेतो नंतर नाही,संयम वगैरे त्यांना सुचवायचे असते.इतरांकडून मिळाला तरच प्यायचा असाही काहींचा दंडक असतो.ऊठसूट कुणालाही चहा पाजायचा नाही असे काही ठरवतात तर चहाशिवाय आम्ही कुणाला जावू देत नाही, याचाही काहींना सार्थ अभिमान असतो.
चहाचे दुष्परिणामही सांगितले जातात.आवडीपुढे त्याचे मोल नसते.चहा खिशाला परवडेल असा आहे.चहाची दुकाने जागोजागी असतात.कितीही गरम असला तरी तो घेताना तोंड भाजत नाही.चहा पीत गप्पा मारण्याची मजा कुछ और असते.' तुझ्या हातचा चहा फार आवडतो' असे बोलून कुणाला खुश करता येते.' सालं फोकलचा चहा शुद्धा पाजत नाही ' एकाच वेळी चहाची तुच्छता आणि महत्व दर्शवले जाते.बोलवा चहाला,मग बोलू.