- ना.रा.खराद
माणसांचा माणसांशी होणारा संवाद किंवा विवाद शब्दांनी होतो.शब्द ही फक्त हवा जरीअसली तरी ते शब्द हवेत कधीच विरत नाहीत.शब्द मनावर कोरले जातात.
शब्दांनी मनुष्य जितका घायाळ होतो तितका शस्त्रांनी देखील होत नाही.शब्दांचा योग्य वापर हा विवेकाने येतो.आपल्या तोंडून सहज निघणारे शब्द मोठे संकट उभे करु शकतात.काय बोलावे ह्याच्याइतकेच महत्त्व काय बोलू नये,ह्यास देखील असते.बोलण्यावर बरेच काही अवलंबून असते.आपण कोणत्या शब्दांचा वापर करतो यावर त्यांचा परिणाम ठरलेला असतो.चूकीच्या शब्दांमुळे शस्त्र हाती घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.शब्दांने हीनवणे किंवा दुखावणे, अपमानास्पद बोलणे,पानउतारा करणे ,टर उडविणे,झोकाचेबोलणे, टोचून बोलणे वगैरे अत्यंत चूकीचे आहे.बोलून नाहक प्रश्न निर्माण करु नयेत.
शब्दांनी वितंडवाद करु नये.खुप जहाळ किंवा शिवराळ भाषा वापरु नये, कुणाच्या वर्मी घाव घालू नये.शब्दांमध्ये
तिरस्कार, द्वेष किंवा कुत्सित भावना असू नये.रागात बोलले जाते ते चूकीचे ठरते.शब्द व्यर्थ असू नये.आवश्यक ते आणि तितकेच शब्द बोलले तर ते परिणाम करते.शब्द भावपूर्ण असावेत,नुसते शुष्क शब्द
कंटाळून टाकतात.शब्दांचा विपर्यास करु नये, खोटे आरोप करण्यासाठी त्याचा वापर करु नये.
भांडणाचे मूळ कारण बोलण्यात दडलेले असते.
अनवधानाने बोलले गेलेले देखील नेहमीच अंगलट येते.शब्दांतून भावना व्यक्त होते.माहिती काहीही असले तरी सगळेच बोलणे योग्य नसते.गरज नसतांना शब्दांचा
दुरुपयोग करु नये.शब्द शब्दांनी माघारी घेतले
तरी ते कधीच विसरले जाते नाही.शब्दांनी शब्द वाढतो, अशावेळी मौन बाळगले पाहिजे.
रागामध्ये चूकीचे शब्द वापरले जातात.प्रसंगी शब्द टाळावे लागतात.जिथे न बोललेले कुबरे तिथे बोलूच नये.काहीही बोलणे बाष्पळ गप्पा मारणे किंवा खोटे बोलणे टाळले पाहिजे.
काहींकडे शब्दांचा तर काहीकडे बुद्धीचा तुडवडा असतो , त्यामुळे चूकीची भाषा वापरली जाते.जीभ घसरली असे म्हणतात.
समंजसपणा अंगी असणारी माणसे शब्द तोलून वापरतात.खुपणारे शब्द तर वापरुच नये.अकारण शत्रुत्व ओढून घेऊ नये.इतरांना त्रास देण्यासाठी शब्दबाण वापरु नये.
शब्द हे धन आहे ते काटकसरीने वापरलेले
बरे.शब्दांची ताकत ओळखली तर ते मोलाचे
ठरतात,नसता वाया जातात किंवा वाया घालवतात.