- ना.रा.खराद
मानवी जीवनात जे मूल्य सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे सत्य सत्य हे एक तप आहे.सत्यापेक्षा मोठे काहीही नाही.सत्य हाच खरा धर्म आहे.जो सत्य वागतो,सत्य स्वीकारतो आणि सत्य बोलतो,तो खरा मानव होय.
सत्याचा मार्ग हा स्वार्थाचा नसतो,न्यायाचा असतो.सत्याचा कैवार घेणे सोपे नसते.सत्यामध्ये जोखीम असते,हा मार्ग खुप खडतर असतो, म्हणून खुप लोक यावरून चालण्याचे धाडस करत नाही.या मार्गावर एकट्याने चालण्याची तयारी ठेवावी लागते,कारण सत्याची बाजू घेणारे दूर्मिळ असतात.
सत्य हे न्यायासाठी असते आणि न्याय हाच खरा धर्म आहे.वाईट ,खोटारडे,स्वार्थी लोक एकत्र येऊन आपली ताकद तयार करतात, परंतु सत्य कधीच पराजित होत नसते.सत्याचा मार्ग हा अग्निपथ असतो, परंतु ध्येय उच्च.सत्य प्रस्थापित करण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो.खोटारड्या लोकांशी झगडावे लागते.त्यांचे दुष्ट हेतू ओळखून ते हाणून पाडावे लागतात, त्यांचें बिनबुडाचे आरोप ज्यास विचलित करुण शकत नाही, तोच खरा सत्याचा कैवारी असतो.
आपल्या स्वार्थासाठी तडजोड करणारे नेभळट लोक मानवाचे काही भले करु शकत नाही, कोणतीही जोखीम नको म्हणून, शेपूट घालून घेणारे नेभळट लोक म्हणजे भूमीला भार आहे,कलंक आहे..
जो सत्याचा कैवारी आहे,तो फक्त सत्य बघतो,तो साक्षात धर्म असतो, जिथे सत्य नाही, तिथे अधर्म आहे.
सत्य हाच न्याय आहे, आणि न्यायापेक्षा महत्त्वाचे या पृथ्वीवर काही नाही.सगळा संघर्ष हा सत्यासाठी आहे.
सत्य मार्गावर चालणारे काही लोक आहेत म्हणून हा समाज टिकून आहे,सत्याचे कैवारी हेच या जगाचे निर्माते आहेत,सत्याशिवाय हे जग म्हणजे असत्याचा धुडगूस ठरले असते, जिथे सत्य नाही, तिथे न्याय देखील नसतो.
शासन आणि प्रशासन ह्याचा मुख्य आधार सत्य असला पाहिजे.प्रत्येक बाबतीत सत्यता तपासूनच निर्णय घेतले पाहिजे, निर्णय हा सत्यावर आधारित असला पाहिजे, कुणावरही अन्याय होणार नाही,सत्याचा हा मूलमंत्र असला पाहिजे.
जिथे पक्षपात आहे, स्वार्थ आहे तिथे सत्य असतं नाही.
सत्याचा कैवार तोच घेऊ शकतो,ज्यास सत्य प्रिय आहे.आपला फायदा नुकसान न बघता केवळ सत्यधर्म जो निभावता तोच खरा सत्यवान असतो.
बुरसटलेले,नेभळट, खुळचट माणसे कधीच या मार्गावर चालू शकत नाही,कारण सत्याचा दिवा नेहमी तेवत ठेवावा लागतो,त्यावर फूंकर मारुन त्यास विझवू पाहणारे
टपलेले असतात, परंतु सत्याची ताकद स्वतः सत्यच असते, आपण फक्त त्याची साथ सोडायची नसते.
सत्याची परीक्षा असते.
सत्य हाच ईश्वर,सत्य हाच धर्म!