परपीडा

                                  परपीडा
                                                - ना.रा.खराद

  इतरांना आपल्याकडून होणारा किंवा दिला जाणारा त्रास म्हणजे परपीडा. बहुतेक माणसे 
इतरांकडून त्रासलेले असतात.आपल्या पासून इतरांना त्रास होतो आहे, हा विचार केला जात नाही, बहुधा जाणीवपूर्वक त्रास देण्याचे कामही केले जाते.कधी स्वतः च्या फायद्यासाठी, कधी इतरांचे नुकसान करण्यासाठी त्रास दिला जातो.
  इतरांना पीडा देण्याचे अनेक प्रकार आहेत. वाचेवाटे दिली जाणारी पीडा दीर्घकाळ टिकते.मनाला लागलेले,झोंबलले शब्द कधीच विसरले जात नाही. इतरांचा अपमान करणे,उपमर्द करणे,कमी लेखणे,वर्मावर बोट ठेवणे या मार्गाने पीडा दिली जाते.हा मानसिक छळ संबंधित व्यक्ती कधीच विसरत
नाही. झोकाचे बोलणे,टर उडविणे,तिरकस बोलणे याद्वारे पीडा दिली जाते.
परपीडा ,छळ हि अत्यंत वेदनादायक असते. काही दुष्ट लोकांना यामध्ये आनंद मिळतो.आपल्या शब्द बाणांनी इतरांना घायाळ करणे हे दुष्टपणाचे आहे. काही प्रसंगी पीडा देणे उद्देश नसला तरी पीडा होते याची जाणीव नसते.
अधिकाऱ्यांकडून,नेत्यांकडून, गुंडाकडून पीडा दिली जाते किंवा होते. शिवीगाळ करणे,अवमान करणे ,धमकी देणे असले प्रकार होतात. कामे आडवणे,चूगली करणे यातूनही त्रास सोसावा लागतो.छेडछाड करणे,टोमणे मारणे,अश्लील इशारे करणे हे खुप त्रासदायक असते.पैसे उकळणे,आर्थिक पिळवणूक करणे ,खंडणी मागणे,जागा वगैरे बळकावणे,अतिक्रमण करणे इतरांना पीडादेणारे आहे. अवास्तव मागण्या करणे,वेठीस धरणे,टाकून बोलणे त्रास दिली देणारे असते.
  एखादा व्यक्ती फार मोठ्याने बोलतो.तो त्याचा स्वाभाविक आवाज असला तरी इतरांना त्रास होतो आहे याची त्यास जाणीव नसणे मूर्खपणाचे आहे. कानठळ्या बसतीलअसा आवाज लोक कितीवेळ सहन करणार!
कित्येक आवारा मुले बाइकवरून फिरतांना कट मारणे,हार्न विनाकारण वाजविणे असले
चाळे करतात. रस्त्यावरचे पथदिवे फोडतात. रस्त्यावर काचा,काटे टाकतात. इतरांना त्रास
होईल असे वर्तन करतात.
   काही उत्सव वगैरे असला की भोंगे लावतात. बस प्रवासात मोबाईलवर गाणे लावतात. इतर
प्रवाशांना त्रास होतो याची जाणीव ठेवत नाही.टि.व्ही.चा आवाज मोठा करतात. शेजाऱ्यांना
त्रास देतात. वाहन बेशिस्तपणे लावतात.सारखे इतरांना काहीतरी मागत राहतात.
शाळेत खुप शिक्षक विद्यार्थ्यांना त्रास देतात. थोड्या कारणाने किंवा अकारण शारीरिक
शिक्षा करतात. मन दुखावेल असे बोलतात.घरामध्ये सासू वगैरे सूनेला माहेरच्या बद्दल
बोलून दुखावतात. इतरांना त्रास देणे चूक तर आहेच आणि इतरांना त्रास होत आहे हे माहीत नसणे मूर्खपणाचे आहे. प्रत्येकाने ह्याचे अवलोकन केले पाहिजे. इतरांना पीडा ,दुःख होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
  
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.