डुक्कर हे खुप गुणी आहे, परंतु तिरस्कृत!

                    डुक्कर
                           - ना.रा.खराद
  मला सर्वच प्राण्यांबद्दल कुतुहल वाटते, परंतु 🐷 डुक्करांबद्दल ते थोडे जास्तच वाटते,कारण गल्लीमध्ये सतत गस्त घालणारा व गल्ली स्वच्छ ठेवणारा प्राणी म्हणून मी त्याच्याकडे बघतो.कुठलाही मोबदला न घेता
हा प्राणी सेवा करतो, तो समाजसेवक आहे.जिथे घाण आहे,तिथे कुणी थांबत नाही, अशा ठिकाणी त्याचे वास्तव्य असते.कुणी हुसकावून लावले की इतरत्र निघून जाते.ते कधीच वर किंवा इकडे तिकडे बघत नाही, फक्त आपले अन्न शोधते.डुकराचे पोट मोठे असूनही ते फार वेगाने चालते.
डुक्कर सब भूमी गोपाल की,असे मानते, त्यामुळे मुक्त विचरण करते.मालकीच्या फंदात ते पडत नाही.जिथे योग्य वाटत नाही, तिथे डुक्कर देखील थांबत नाही.
डुक्कर हे खऱ्या गुणी माणसासारखे उपेक्षित आहे,कारण ते लडिवाळपणा करत नाही.कुठे थांबत नाही, विनाकारण आपला आवाज ऐकवित नाही, कुणाकडे आशेने बघत नाही.लोकांना जे नको असते, ते तो खातो आणि सरळमार्गी जीवन जगतो.
इतर प्राण्यांशी कुठलेही वैर नसलेला हा प्राणी आहे.त्याच्या अंगाला कायम घाण असल्याने कुणी जवळ
थांबत नाही.अन्न आणि पाण्यावाचून डुक्कर मेले असे मी
कधी ऐकले नाही.एकदा पोट भरले की शांत पडून राहणे फक्त डुकरांनाच जमते.पोट भरलेली माणसे अनेक उचापती करत फिरतात.असो.
डुक्कर या प्राण्यात मला अनेक गुण दिसून आले.काहीही कारण नसताना आपण त्याचा तिरस्कार करतो ,हे योग्य नाही.
एकाच वेळी अनेक पिल्लांना जन्म देणारी मादी,सर्व
पिल्लांना दूध पाजते,त्यांचे संरक्षण करते,आई म्हणून ती खूप महान असते.फक्त ती डुकरिन असते.
  डुक्कर हे अत्यंत संयमी व शांत स्वभावाचे असते, फक्त आपले पोट भरावे एवढीच त्याची इच्छा असते .पोटात जेवढा बसेल तेवढाच ते संग्रह करते.हे जग आपलेच आहे, इतरांना त्रास न होऊ देता पोट भरण्याचा अधिकार आपणास आहे, हे त्यास तो अशिक्षित असूनही कळते.आपल्या पिलांना सोबत घेऊन फिरणारी मादी त्यांची जपवणूक करते.बाप हा ताप त्यांच्या सोबतीला कायम नसतो.नाली हेच डुकराचे अन्नछत्र असते, लोकांना नको असलेले आपल्या पोटात भरणे किंवा लोकांच्या उदरातून बाहेर आलेले, उदरस्थ करणे हिच त्यांची दिनचर्या असते.याशिवाय जगण्यासाठी फार काही करावे लागते असे त्यांना वाटत नाही.
डुक्कर मुक्तपणे व मुकपणे वावरते, कुणालाही इजा न करता,कुठलाही अतिरेक न करता,सर्व मर्यादा पाळत आपले विचरण करत असते.
डुक्कर अकारण इकडे तिकडे बघत नाही,त खुपसता येईल अशा आकाराचे तोंड असल्याने नाली ही डुकरांसाठी आहे की डुक्कर नालीसाठी आहे हे उमगत नाही.
कुठेही लोळले तरी ते सुखी राहू शकते.त्यासाठी त्यास हक्काची जागा लागत नाही,कुणी हाकलले तर ते निघून जाते.त्याची काही तक्रार नसते.
शरीर लठ्ठ असले तरी पाय बारीक असतात, 
ते गरजेनुसार आखडता येतात, लवचिक असतात.
खरोखर डुक्कर हा एक गुणवंत प्राणी आहे.
   
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.