मी शाळेत पाचवीच्या वर्गात असतांना ,आमचे इंग्रजी विषयाचे शिक्षक ,अक्षर चांगले काढले की
Good असा शेरा द्यायचे.त्यामुळे चांगले अक्षर काढून 'गुड' मिळवायची असाच सर्वांचा प्रयत्न असायचा.इतर मुलांमध्येही जाणूनघ्यायचीउत्सुकताअसायची.चेहऱ्यावरील हास्य बघून चाणाक्षमुलेओळखायची.काही मुले वही दाखव म्हणायचे.आतापर्यंत मिळालेल्या 'good' चा हिशोब व्हायचा.या स्पर्धेत पाच सहा मुले असायची,इतर मुले कधीच good न मिळालेलीअसायची.ती स्पर्धेत नसायची.कविता सुरातगायली,उजळणी तोंडपाठ असली की शिक्षक छान,शाबास असे कौतुक करायचे. ती एक प्रेरणाअसायची.चांगले काही केले की मोठी माणसेही शाबासकीद्यायची.बालमनावर त्याचा खोलवर परिणाम व्हायचा.पुढे याचे अनेक कंगोरे उलगडतगेले.
आजस्तुति,प्रशंसा, कौतुक, अभिनंदन,गौरव,प्रशस्तिपत्र, अभिष्टचिंतन,या शब्दांनी चोहोबाजूंनी उच्छाद मांडला आहे.जिकडे तिकडे समर्थक, चाहते,पारखी ,गुणपुजक,कलाप्रेमी, साहित्य रसिक अशा गुणी लोकांना हेरुन वरीलपैकी एक प्रदान करुन मोकळे होतआहेत.देशातील पुरस्कारांची संख्या लोकसंख्येनुसार वाढतआहे.घेणाऱ्यांपेक्षा देणारेउतावीळ आहेत.त्यांनी स्थापन केलेल्या संघटना, संस्था,मंच वगैरेंचा लौकिक त्याशिवाय होणार कसा?आता जवळजवळ सर्वच कलाकार पुरस्कार प्राप्तआहेत.किमान गल्लीतल्या गणेश मंडळ आयोजित काव्यवाचन मध्ये त्यास 'कवीभूषण' हा पुरस्कार मिळालेला असतो.भले रक्कम पन्नास रुपये असेल
परंतु पुरस्कार पैशात मोजत नसतात असेच नेहमी देणाराकडून ऐकलेले आहे.राज दरबारात भाट असायचे.स्तुतिपाठक ही आवश्यकता बनते.भाडोत्री स्तुतिपाठकही असतात. स्तुति सर्वांना प्रिय असते म्हणतात.म्हणूनच ती कुणाचीही केली जाते.आपली होणारी स्तुति खरी आहे की खोटी? स्तुति करणाराला अक्कल आहेकी नाही?स्वत:चा मोठेपणा वाढविण्यासाठी तर ती स्तुति नाही ना? असली शंका कुणी घेत नाही.
आता मुलगा दुसरीत पहिला आला तरी अभिनंदनाचा वर्षाव होतो.लग्न लागताच वधू वरांना शुभेच्छा देण्यासाठी रांग लागते.लग्न करुन त्यांनी कोणता तीर मारलेला असतो!
कुणी दुचाकी खरेदी केली की , अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या जातात की ,'आपण उशीर केलाअसे वाटायला लागते.' मुल झाले लगेच अभिनंदन.काही हौसी वाढदिवसाच्या शुभेच्छा चौकात पोस्टर लावून देतात.इतरांना खुश करण्यासाठी ही खुशामतकला फार फोफावली आहे.आपल्या प्रत्येक गोष्टीला चांगलेच म्हटलं पाहिजे,असा एक अट्टाहास दिसत आहे.दोनशे रुपयांची सापडलेली पिशवी परत केली म्हणून सर्व थरातून त्याचे कौतुक होते.
प्रामाणिकपणादूर्मिळ झाला असेच त्यावरुन दिसते.आता फक्त निमित्त लागते.कुणी कुणाचीही आणि कशाचीही ऊठसुट स्तुति करते आहे.एकाहीमहापुरुषांच्या वाट्याला जे आले नाही ते आता सहज सुलभ झालेआहे.मोठ्या तपश्र्चर्येने जे ऐकायला मिळत नव्हते ते आता एखादे झाड लावले तरी कुणीतरी,'वृक्षमित्र' म्हणून गौरव करतेच.एखादे गाणे गायले की ',भावी लता ' हे बिरुद लावणारेकुणीतरी गुणपारखी असतेच.राजकारणात पडलेलेकित्येक कायम 'भावी' असतात. स्तुति सहज ,खरी असेल तर तीचे मोल आहे.कित्येक लोक एखाद्या लेखकाचे पुस्तक न वाचताच स्तुति करतात,"आपण अप्रतिम लिहिता."पुरस्कार मिळाला म्हणून पुन्हा आठवडाभर त्याचे सत्काराचे कार्यक्रम चालतात.एकदा एखादा पुरस्कार मिळाला किंवा मिळवला की आजन्मते शेपूट लागते.मग अमुकभूषण तमूक भूषण पासून तर हे रत्न ते रत्न असले हजारों शेपटंकायम चिकटलेले असतात.एकदा मोठा पुरस्कारमिळाला की त्यापेक्षा लहान पुरस्कार त्यास देता येत नाही.ज्यांना लहान मिळतो त्यांना मोठा मिळतनाही.
सर्व प्रकारच्या शुभेच्छा देखील स्तुतिच असते.एखाद्यास प्रसन्न करण्यासाठी जे केले जाते ती स्तुतिच. मुलांचे जावळ काढले तरी अभिनंदनाचा वर्षाव होतो.कुणाचा बाप मेला तरीअत्यंत आनंदाने,"भावपूर्ण श्रद्धांजली" असा मेसेज पाठवतात.
स्तुति करण्यामागे कित्येक वेळा स्वार्थ दडलेला असतो.कुणी कुणाची अकारण स्तुति करत नाही.क्वचितच ती निरपेक्ष असते.जिथे स्वार्थ तिथे ती करणे अपरिहार्य असते.ऐकणारे शंका घेत नाहीत, यामुळे ती यशस्वी होते.
स्तुतिसुमनं तर फार उधळली जातात.नको त्या माणसाबद्दल , त्याच्यामध्ये मूळीच नसलेल्या गुणांबद्दल ऐकून घ्यावे लागते.एखाद्यास मोठे करण्यासाठी मोठी माणसेही स्तुति करतात.
आपलीच माणसे मोठी करण्यासाठी स्तुति केली जाते.प्रेमी आपल्या प्रेमीकेची,नवरा बायकोची स्तुति करतो. स्तुति खरी असो की खोटी पण तीचीमहिमा अपरंपार आहे.जे डोळे झाकून स्विकारली जाते.करणारे शहाणे असतील परंतु ती ऐकणारे तसे असतीलच असे नाही.