जसे ज्यांचे कर्म तसेच फळ मिळते, त्यातून सुटका नसते.

                                      जैसे ज्याचे कर्म...
                                                              - ना.रा.खराद
आपण अनेक प्रकारचे सतत कर्म करतो.आपण काय करायचे हा आपला हक्क असतो.वृत्ती, विचार,गरज ह्यातून कर्म आकार घेते.आपल्या कर्मांतून आपली ओळख होते.
कर्मानुसार फळ मिळते असे आपण ऐकतआलो आहोत किंवा पेरले ते उगते असेही बोलले जाते.थोडक्यात आपण जसे कर्म करतो तसेच आपल्या वाट्याला येते याविषयी आता शंका उरलेली नाही.
  आपणच आपले शत्रू किंवा मित्र असतो.चांगले विचार आणि चांगला मार्ग निवडला पाहिजे.स्वार्थ किंवा दुष्ट विचार
कधीतरी गोत्यात आणतोच.आपण जितके सरळमार्गी तितके सुखी होऊ शकतो.
  अवतीभोवती नजर टाकली की असली शेंकडों उदाहरणे सापडतील.किंबहूना आपल्या जीवनात देखील असे अनुभव येतात.चांगले,वाईट कर्म तशाच प्रकारे फळ देते.माणसाची जी वाईट दशा होते,त्यास तो मनुष्यच कारणीभूत असतो.तात्पुरत्या फायद्यासाठी एखादे अघोरी कर्म केल्याने त्याची फेड तितकीच भयंकर असते.एखादे कर्म चूकीचे आहे हे माहिती असूनही ते कृत्य करणे कित्येकांना महाग पडलेले आहे.चोरी,लबाडी, फसवणूक,लूट,शोषण,छळ हे विषारी कर्म  विनाशकारी ठरते.क्षणिक लाभ दीर्घकाळ सतावत असतो.चांगले असो वा वाईट त्याचा परिणाम लगेच
दिसत नसतो.एका गुन्ह्याची शिक्षा दूसऱ्याच कारणाने मिळते.पुण्यकर्म कधीतरी फळाला येते.जसे कुजलेले पान लवकर गळते,सडलेले फळ फारकाळ जागेवर राहत नाही तसे वाईट विचार माणसाला लयाला घेऊन जातो.
  स्वार्थी विचार केल्याने अनर्थ होतो.कारस्थानी लोक आपल्याच जाळ्यात अडकतात.कुभांड रचणाराचे बिंग फूटतेच.छळवादी,अत्याचारी वाईट मौत मरतो.कर्मफळातून कुणाचीच सूटका नसते.वाट्याला तेच येते ज्याची आपण
वाट तयार केलेली असते.नैतिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे.खोटारडेपणा सोडून दिला पाहिजे.स्वार्थासाठी कुणाविषयी अपशब्द वापरु नये.स्वत:चे भाग्य स्वत: खराब करु नये.सत्याची बाजू सोडू नये.
 अन्याय तर कधीच करु नये.कुणाला कमी लेखू नये.अपमान तर मूळीच करु नये.सत्कर्म उघड करु नये.पापकर्म झाकू नये.अंगी विवेक असावा.अज्ञान ओळखावे.मूर्खांसारखे कृत्य करु नये.कुणाशी तंटो नये.चांगले हवे असेल तर चांगले दिले पाहिजे.
         
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.