शेतकरी हा समाजाचा कणा आहे,तो कायम ताठ असला पाहिजे.

                  शेतकरी
                             - ना.रा.खराद
  जगण्यासाठी जे काही खाद्य हवे असते ते सर्व मातीतून मिळते आणि मातीत आपली मती आणि श्रम मिसळून त्यातून ते खाद्य उगवणारा अन्नदाता शेतकरी आहे. शेती उद्योग एक पारंपरिक व्यवसाय आहे.अनेकांच्या अनेक 
पिढ्या शेतात राबल्या . 
  शेतात अत्यंत काबाडकष्ट करावे लागतात.
ऊन,वारा,पाऊस सर्व सहन करावे लागते.त्याची उपजीविका ती काळी माती भागविते.शेतकऱ्यासाठी त्याचे शेत जीव की प्राण असते.कोरडवाहू शेतीत तर काहीच पिकत नाही.अल्पभूधारक शेतीवर गुजराण होऊ शकत नाही.शेतकरी कायम अडचणीत असतो.मोजके शेतकरी सधन आहेत.ओलिताखाली जमीन असेल, त्यासाठी लागणारे भांडवल असेल तरच शेतीतून काही पदरात पडते.नुसत्या शेतीवरअवलंबून रहाणे आता शक्य नाही.जोडधंदा आवश्यक आहे.
  शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने, अचानक कोसळणारे भाव यामुळे शेतकरी हवालदिल होतो.आर्थिक चनचन कायम असल्याने बाजारात किंमत नाही, त्यामुळे सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन अधिकच भरटला जातो.
 अल्पकाळात उत्पन्न देणारी पिके जसे भाजीपाला,फळे वगैरे घेणे आवश्यक आहे.शेतकऱ्याची दैना काहीकेल्या
फिटेना.शेतकरी केंद्रबिंदू मानून योजना आखणे गरजेचे आहे.त्याची अंमलबजावणी झालीचपाहिजे.शेतीमालाला भाव मिळवून दिला पाहिजे.अन्नदाताच जर उपाशी रहात
असेल तर कसे होणार.शेतकऱ्याकडे पैसा नाही म्हणून सन्मान नाही.जो कष्ट करतो त्याचा प्रथम मान हवा.त्यासाठी आपली धारणा बदलणे गरजेचे आहे.शेतीमुळे गांव सोडता येत नाही.गावात राहून पोट भरत नाही मग काय करायचे,हा यक्ष प्रश्न आहे.
अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही.
शेतीसाठी पाणी आणि वीज खुप महत्वाचा घटक आहे.शेतमालाची चोरी किंवा जंगली प्राण्यांकडून होणारी नासधूस हा एक यक्षप्रश्न असतो.रानडुक्कूर,वाघ किंवा इतर हिंस्र प्राणी टपलेले असतात.चोर देखील वाडी वस्तीवर हल्ले करतात,किती हे संकट!
 मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारा, त्यांना कधी उपासी न राहू देणारा शेतकरी स्वतः मात्र अर्धपोटी राहतो,ह्याची इतर घटकांना कधीतरी जाणीव व्हायला हवी.
देव सगळं भलं करेल,अशी भाबडी आशा तो किती दिवस ठेवणार आणि आपण मलिदे खाणार, त्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा.शेतकरी राजा, म्हणणार आणि त्यास भिकारी बनवून टाकणार , हे पातक आहे, हे समाजाला कधीतरी घातक ठरणार हे निश्चित!
  राज्यकर्त्यांनी शेतकरी सर्वोपरी मानला पाहिजे,तो दुर्लक्षित राहता कामा नये.त्याचे सुखदुःख शासनाने बघितले पाहिजे,त्याचे अश्रू पुसले पाहिजे.
 शेतकरी हा फक्त स्वतःसाठी राबतो असे नाही,तो खऱ्या
अर्थाने जगाचा पोशिंदा आहे, परंतु तोच जर हलाखीचे आयुष्य जगत असेल तर समाजासाठी ते लांच्छनास्पद आहे.
त्यासाठी खास उपाय असावेत.प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. शेतकरी हाच या समाजाचा कणा आहे तो मोडकळीस येऊ नये याची खबरदारी शासनाने घेतलीच पाहिजे. 
      
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.