स्तर, खरोखर गरजेचे आहेत का?

                                               स्तर
                                                            - ना.रा.खराद
परीक्षा उत्तीर्ण झालो आणि मला ओळखीचे लोक ग्रेड विचारु लागली.प्रथम श्रेणी वगैरे हे माझ्या कधीच नव्हते, थर्ड क्लास सारखे शब्द खुप छळायचे, परंतु आम्ही मात्र मध्यमवर्गीय,कायम सेकंड क्लास मध्ये पास व्हायचो.प्रथम श्रेणीतील मुले आमच्याकडे तुच्छतेने बघत, अशावेळी आम्ही काही विद्यार्थी थर्ड क्लास
मुलांकडे बघून समाधान मानायचो.पुढे कळाले की असमाधान झाकण्यासाठी समाधान मानायचे असते.
   मला हा कायम प्रश्न पडतो की श्रेणी,स्तर,लेवल, पातळी, दर्जा आपण कसे ठरवतो आणि कशासाठी?
  चातुर्वर्ण्य व्यवस्था हा एक असाच प्रकार आहे.गेली हजारों वर्षांपासून माणसे यामध्ये अडकून पडली आहेत.कारण वर्णव्यवस्था असो की कोणतीही व्यवस्था ही कुणीतरी निर्माण केलेली असते.तो निर्माता,
त्याची योग्यता,त्याचा हेतू तपासला पाहिजे.माणसांचे जे स्तर ठरवले गेले आहेत, ते कुणी एकाने ठरवले आहेत, ते ज्यांना फायद्याचे वाटतात, ते त्यांचे समर्थन करतात,त्याचा अंगीकार करतात, उदोउदो करतात.
  दर्जा किंवा स्तर या समाजाला एक कलंक आहे.नोकरीमध्ये देखील अ,ब,क असा दर्जा असतो.दर्जेदार
या शब्दाचा जन्म यामधूनच.शासनाचे पुरस्कार असेच चढत्या किंवा उतरत्या स्तराचे असतात,रोख रक्कम देखील स्तर बघूनच.मानसन्मान देखील लेवल बघून.स्पर्धा, पुरस्कार राज्यस्तरीय.प्रसिध्दी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वगैरे.विश्वस्तर किंवा आखिल भारतीय.
  एकाच वस्तूंचे शुद्धा स्तर ठरवले जातात.किंमतीवरुन स्तर किंवा दर्जा ठरवला जातो.चित्रपट गृहात बाल्कनी इ. स्तर असतात.आर्थिक स्तर एक महत्त्वाचा घटक बनला आहे.मंत्रीमडळात केबिनेट आणि राज्यमंत्री असतात, यावरुन दर्जा ठरतो.काही पदे दर्जेदार असतात.स्तर हा थर मानला जातो.सर्व थरातून
माणसे जमली असे बोलले जाते.चित्रकलेच्या परीक्षेत ग्रेड दिले जातात.वेतन आयोग ग्रेड निश्चित करतो.
   प्रतवारी ही स्तर ठरवण्यासाठी असते.आपली लेवल बघून माणसाला वागावे लागते.त्यासाठी लेवल ओळखावी लागते.इतरांना त्यांच्या दर्जा नुसार मानसन्मान द्यावा लागतो.उंची गाठली स्तर उंचावतो.
 आपला दर्जा किंवा स्तर सिद्ध करावा लागतो.उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते किती मिळाले ह्याचा हिशोब केला जातो.क्लास वन वगैरे उच्च स्तर दाखवतो.जातीचे आणि मातीचे देखील स्तर केले गेले आहेत.
रक्ताचे गट ,बी.पी., शुगर लेव्हल तपासणी केली जाते.बुद्ध्यांक ठरवला जातो.एखादी समिती उच्चस्तरीय असते.चौकशी उच्चस्तरीय असते.
   माणसाची लेवल बघून त्याचा मानसन्मान केला जातो.मानवी मन नेहमीच असे स्तर ठरवित आलेले आहे.सर्वच ठिकाणी श्रेणी पाडली किंवा मानली जाते.स्तर हे आपण ठरवितो.संपूर्ण मानवजात एक आहे असे मानणारे स्तर मानत नाहीत.आर्थिक स्थितीवरुन स्तर ठरवणे चूकीचे आहे, आणि परीक्षेत मिळणाऱ्या
गुणांवरुन स्तर ठरवणे न्याय्य नाही.

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.