सौजन्यशीलता

                   सौजन्यशीलता

सौजन्यशीलतेची सर्वत्र गरज असतांना ती फार त्रोटक प्रमाणात दिसून येते आहे, संपुष्टात येण्याच्या जवळ ती पोहचली आहे.आता फक्त बैंकैकडून कर्जावर घेतलेल्या ट्रक्टरवरच ते वाचायले मिळते.हल्ली तत्वज्ञान देखील ट्रकच्यामागच्या बाजूला लिहिलेले असते.
    स्वतः च्या पत्रावळीवर भात ओढण्याची प्रवृत्ती
यामागे असते.मला अगोदर पाहिजे हा अट्टाहास
जिथे आहे ,तिथे सौजन्य नाममात्र शुद्धा नसते.
सुखात इतरांना वाटेकरी करण्याची, स्वतः बरोबरच इतरांचाही विचार करण्याची खरी गरज असते मात्र माणसे स्वतः इतकी इतरांच्या बाबतीत संवेदनशील रहात नाहीत.
   सौजन्यशीलतेसाठी संवेदनशील असणे गरजेचे असते.कुत्र्यांमांजराकडे सौजन्य दिसत नाही.
हिसकावणे,लुबाडणे, बळकावणे एवढेच
त्यांना माहित असते,आपण त्यांच्यापेक्षा किंचित
जरी वेगळे असू तर सौजन्यामुळे.हे सौजन्य ,ही
उदारता,कृपा अनेक ठिकाणी बघायला मिळते.
माणसातले माणुसपण दिसते ते या सौजन्यामध्ये.जसे कित्येकांच्या कृपेने आपले जीवन समृद्ध होते तसे ते आपल्यामुळे देखील व्हावयास हवे.
   इतरांना सामावून घेणे शक्य असतांना तसे न करणे , इतरांसाठी काही करणे सहजशक्य असून देखील सहकार्य न करणे हे बघायला मिळते.इतरांच्या भावना,गरजा समजून घेण्यासाठी संवेदनशील मन लागते.एक चांगलामाणुस म्हणून नाव कमावणे सोपे नसते.
  लहान लहान गोष्टींत सौजन्य दिसून येते.ठिकठिकाणी सौजन्याची खुप गरज आहे.साधनांचा विकास झाला तसा तो मानवी गुणांचा देखील व्हावयास हवा.मानल साधनांनी नाही तर मानवी गुणांनी सुखी होऊ शकतो.
    
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.