नाव

                     नाव !

आयुष्यभर आपणास विचारला जाणारा प्रश्न,“ तुमचे नाव काय?" मरेपर्यंत आणि मरणानंतर देखील आपणास चिकटून असलेले नाव आपण स्वतः ठेवलेले नसते.
नावाचा विस्तार अफाट आहे,जिथे तिथे त्याची गरज आहे,नावा इतके गाजलेले काहीच नसते.आपण गेल्यावर पाठीमागे उरते ते फक्त नाव.ते कुण्या कागदावर असते,दगडावर असते तर कुणाच्या हृदयात कोरलेले असते.कुणाच्या स्मरणात, कुणाच्या ध्यानात, कुणाच्या मनात तर कुणाच्या डोक्यात असते.
नाव कमावले जाते,गमावले जाते, वापरले जाते.नाव नोंदवले जाते, गोंदवले जाते.नाव ठेवले जाते,कशात गोवले जाते.नावासाठी काही केले जाते.कुणाचे नाव गावभर तर जगभर असते.नावाला जपावे लागते.कुणाचे नाव पोलिस ठाण्यात लावलेले असते, कुणाचे बसस्थानकावर.
कुणाच्या नावाचा जयघोष होतो.नावाचे
नामस्मरण होते.नवरदेव नवरी एकमेकांचे नाव घेतात.कुठल्या तरी क्षेत्रात कुणाचे नाव असते.अनुदान यादीत नाव शोधले जाते.नाव लपवले जाते, कळवले जाते.नावावरुन लग्न जुळवले जाते.नाव गाडले जाते,नाव जोडले जाते.नाव ऐकलेले असते.कुणाच्या नावात दहशत असते,दरारा असतो.कुणाचे क्षणात नाव होते.जन्माची वेळ, घरातील वातावरण बघून नाव ठेवले जाते.कित्येकाच्या नावात आणि वागण्यात ताळमेळ नसतो.
सार्वजनिक ठिकाणी काहींची नावे झळकतात, शौचालयाच्या भिंतीवर देखील काहींच्या नावाचा उद्धार केला जातो.
नोकरीसाठी मुलाखत असो की लग्नासाठी पोरगी बघणं असो ,नाव विचारले जाते.काही बरे वाईट केले की नाव विचारले जाते.घराबाहेर नेमप्लेट असते.घरावर नाव असते,कुणी वाहनांवर नाव लिहिते.शेत,घर ,वाहन कुणाच्या तरी नावावर असते.निवडूकीत नामनिर्देशन अर्ज दाखल केला जातो.नाव बघून मतदान केले जाते.कुणी कुणाच्या नावाने मतदान मागते .
किल्ले किंवा ऐतिहासिक ठिकाणे इथे कुणी आपले नाव लिहिते.देवाचे नाव घेतले जाते.
पुस्तकावर ,वहीवर नाव लिहिले जाते.सातबाऱ्यावर नाव लावले जाते.कुणाशी आपले नाव जोडले जाते.
हजारों वर्षांपासून नाव ही संकल्पना आहे.
नाव शोधले जाते, विसरले जाते.नाव टाळले जाते, पाळले जाते.
नावाचा महिमा अपरंपार आहे.ज्यास तो समजला तो धन्य झाला.
               
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.