बाहेरचा माणूस
नऊ महिने आईच्या उदरात राहून जेव्हा बाळ ' बाहेर ' पडते, तेव्हा पासूनचा त्याचा संपूर्ण जीवन प्रवास ' बाहेर ' शब्दाने व्यापलेला आहे.बाहेर या शब्दाभोवतीचे भावविश्व फार मोठे आहे.
आपण सर्व या जगात बाहेरची माणसे आहोत.मृत्यू मार्गाने आपण येथून बाहेर पडतो, म्हणून मृत्यूला एक्झिट म्हणतात.आपण जिथे कुठे आत जातो , तेथून बाहेर पडतो.काही ठिकाणी आपण स्वतः बाहेर होतो,तर काही ठिकाणी आपणास बाहेर काढले जाते.जगात एकाच वेळी करोडो माणसे बाहेर पडत असतात.
भिकाऱ्यांना घराबाहेर काढण्यापासून तर आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यापर्यंत या ' बाहेरची' मजल गेलेली असते.जितकी आत घुसण्याची धडपड असते,तितकी बाहेर पडण्याची देखील असते.
बालपणापासूनच बाहेर या शब्दाचा खेळ सुरू होतो.शाळेत असताना गणवेश नसलेली मुले बाहेर काढली जातात, अनेक कारणांमुळे कधी वर्गाबाहेर तर कधी शाळेबाहेर काढले जाते.खेळामध्ये आऊट झाले की खेळाबाहेर व्हावे लागते.
अश्रू डोळ्यांबाहेर वाहतात,मलमूत्र शरीराबाहेर फेकले जाते.घरातील केरकचरा घराबाहेर काढला जातो.जमीनीतले खनिज किंवा पाणी जमीनीबाहेर काढले जाते.तिळातून तेल बाहेर काढले जाते.चपलेतून पाय बाहेर काढला जातो.
कुणी पक्षातून बाहेर पडतो.कुणी गावाबाहेर तर कुणी देशाबाहेर पळून जातो.कुणी मतदारसंघाच्या बाहेरचा असतो.कुणी जातीबाहेर टाकला जातो किंवा असतो.
कुणी रागाने बाहेर निघतो , कुणाला तसेच
बाहेर हाकलून दिले जाते.शब्द देखील बाहेर
पडतात.पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी मार्ग असतो.प्रत्येक ठिकाणी एक्झिट असतेच.
रिटायर होणे म्हणजे नोकरीच्या बाहेर होणे.
अपात्र होणे म्हणजे त्यातून बाहेर होणे.बाहेर
मानसिक प्रक्रिया देखील आहे.कुणी मनातून काढून टाकतो , मनाच्या बाहेर.
बायको किंवा मुलांना,आई किंवा वडीलांना घराबाहेर काढले जाते.आत जितकी माणसेअसतात,
तितकीच बाहेर धडपडत असतात.कुठे आत जाण्यासाठी तर कुठे बाहेर पडण्यासाठी.जे एकासाठी आत असते, तेच दूसऱ्यासाठी बाहेर असते.कधीबाहेर होणे सुखद असते,तर कधी दुःखद.
एखाद्या आजारातून बाहेर पडणे किंवा संकटातून बाहेर पडणे सुखाचे असते.बाहेर हा शब्द कांद्याचा पापुद्रा असतो,तसा आहे.उलगडलेला बाहेर होऊन जातो.बसमध्ये संकटकाळी बाहेर पडण्याचा
मार्ग असतो.
बाहेर ही संकल्पना खुपच व्यापक आहे.आत घूसण्यासाठी बाहेर पडावे लागते.घरातली माणसे बाहेर पाऊस आहे म्हणतात.खिशातले पैसे बाहेर काढले जातात.नखातील, कानातील मळ बाहेर काढला जातो.जागा अपूरी असेल तर बाहेरथांबावे लागते.
अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो.शिक्षा भोगून कैदी बाहेर पडतो.
चप्पल वगैरे मंदिराबाहेर सोडली जाते.बाटलीमधले पाणी, औषधे बूच काढून बाहेर काढले जाते.तळलेले पदार्थ कढईच्या बाहेर काढली जातात.कुठे सत्तेत
बाहेरुन पाठिंबा असतो.कुठे बाहेरुन बघितले जाते.कुठे बाहेरचे लोक बाहेर काढले जातात.
संपूर्ण जीवन या बाहेरच्या चक्रव्यूहात अडकलेले असते.मृत्यु हा आपला अखेरचा एक्झिट असतो.