मानवी स्वभावानुसार अनेक मानव खोटारडे असतात.खोटे बोलणे काहींची गरज असते, काहींचा स्वभाव असतो,
काही स्वार्थासाठी खोटे बोलतात. काहींना आपण खोटे बोलतो ,हे देखील माहीत नसते तर काहींना आपल्याखोटेपणाचा अभिमान असतो.
सर्व ग्रंथ ,खरे बोला असे सांगतात. साधुसंतांचाही खरेपणाचा आग्रह आहे. परंतु खोटेपणा कधीच नष्ट होऊ शकलेला नाही. खोटेपणा हा खरेपणाच्या आश्रयाने वावरतो.सगळेच खोटे बोलले तर खोटेपणाने काहीच साध्य होणार नाही. अनेकजन भितीमुळे खोटे बोलतात. खोटेपणाचे बाळकडू घरातच मिळालेले असते. मुले शाळेत शिक्षकांना खुप खोटे बोलतात. मला घरी काम होते म्हणून होमवर्क केला नाही.गैरहजर राहण्याचे कित्येक खोटी कारणे सांगतात. घरकाम टाळण्यासाठी ,शाळेचे खुप काम आहे, असे आई वडिलांना सांगतात. गुण वाढवून सांगतात.
सोईरिक जुळवताना मुलाचे शिक्षण,संपत्ती किंवा पगार खोटा सांगतात. आपले आंबट आंबे ,गोड आहेत असे
सांगत ते विकले जातात. कित्येक नेते खोटे बोलून निवडणूका जिंकतात. आपल्या संपत्तीची खोटी माहिती
देतात. अनेक महिला आपल्या पतिसी खोटे बोलतात.आजारी नसतांना आपल्या बरे नाही, असे खोटे सांगतात.
माहेरी जाण्यासाठी काहीतरी खोटे कारण सांगतात. घरात मुले वडिलांकडून पैसे मिळवण्यासाठी खोटे बोलतात.
खरेपणावरील अविश्वास हा खोटेपणा वाढीस कारणीभूत आहे. आपण खरे बोललो तर अडचण येईल म्हणून खोटे
बोलून सुरक्षित वाटत असावे.आपला कमीपणा इतरांना माहीत होऊ नये म्हणून खोटे बोलले जाते. अनेकवेळा
समोरच्याने आपला खोटेपणा ताडलेला असतो परंतु त्याची अडचन तो जाणून असतो.
एखादा व्यक्ती सतत खोटे बोलतो असे परिचिताना माहीत असते .त्याच्यावर कुणी विश्वास ठेवत नाही. खोटेपणा
हा खरेपणा वाटावा इतका अस्सल असेल तर तो फायदेशीर ठरतो.आपण तो कितपत कौशल्याने वापरतो
यावर त्याचे यश अवलंबून आहे.
एखाद्याचे वाचायला घेतलेले पुस्तक न वाचता घरी ठेवून थोडे वाचणे बाकी आहे, असे खोटे बोलायचे.उसने घेतलेले पैसे वेळेवर परत न करता ,प्रत्येक वेळी नवीन खोटे बोलायचे हे अनेकांना जमते.
लग्न जुळवण्यासाठी आपल्या मुलीबाबत खोटे बोलले जाते. ती स्वयंपाक खुप छान करते.नसलेले अनेक गुण
सांगितले जातात. बैल बाजारात तर बैलाचे खोटे वर्णन केले जाते. अनेक दुकानदार आपण पसंद केलेल्या कापडाबद्दल खोटे बोलतात. हा कपडा खुपच खपला.एवढाच शिल्लक आहे. अमुकने खरेदी केला वगैरे.
कित्येक हजाम,आपल्याकडे अमूक मोठा माणूस केस कापून घेतो असे सांगतात. आपल्या ओळखीच्या लोकांची नावे सांगतात. सर्वाधिक खपाचे दैनिक, असे सर्वच दैनिकावर असते. कसे शक्य. पण खोटे चालते.खोटे ऐकण्याचीही सवय झाली आहे. कुणी खरे बोलले की आश्चर्य वाटते. त्याची चर्चा होते. त्याने असे नको बोलायला पाहिजे होते. महाराज, कथाकार ,पुरोहित अधिकावाणीने खोटे बोलतात.त्यांचे एकही विधान खरे ठरत नसतांनाही त्यांचा सन्मान टिकून आहे.
न्यायालयात तर प्रत्येक गुन्हेगार मी खरे बोलतो आहे अशी शपथ घेत खोटे बोलतो.वकील देखील खोटे बोलतात केस जिंकण्यासाठी. खोटेपणा खुप व्यापक आहे. कधी तो संपेल असे वाटत नाही. त्याची आता सवय झाली आहे.