अचानक

                अचानक 
                           - ना.रा.खराद
          रस्त्यावर चालताना मला अचानक सांप दिसला आणि मी ' अचानक ' या विषयावर लिहायचे ठरवले.अचानक या शब्दाला अनेक पर्यायी शब्द आहेत.
एकाएक, आकस्मिक वगैरे.आपल्या संपूर्ण आयुष्यात ठरवून केलेल्या गोष्टींपेक्षा अचानक घडलेल्या गोष्टी जास्त असतात.आपणास ज्ञात असलेल्या कमी अज्ञात असे बरेच घडत असते.पुढच्या क्षणाला काय घडणार हे देखील माहिती नसते.भूकंप, वीज कोसळणे,पूर येणे अचानक घडते.निसर्ग अचानक कसा बदलेल सांगता येत नाही.
 अचानक वजन वाढणे किंवा कमी होणं.
वीज गायब होणे,ढग जमा होणे.
 आपल्यासाठी या अनपेक्षित घटना अचानक सदरात मोडतात, परंतु ते एक चक्र आहे, निसर्ग नियम आहे नियत आहे,ते घडणार असते.जीवनाचे गमक या अचानकमध्ये दडलेले आहे.अचानक नेहमी वाईट घडते असे नाही, कित्येक चांगल्या, आनंदाच्या, फायद्याच्या गोष्टी अचानक घडतात.
  काही समजण्याच्या आधीच खुप काही घडून जाते.कुणाला अचानक धनलाभ होतो तर कुणाची अचानक स्मृती जाते.कुणी अचानक भेटतो तर कुणी अचानक निघून जातो.आपणास ज्या गोष्टीची साधी जाणीव नसते, अशा घटना जीवनात घडत असतात.
 कुणी अचानक बेशुद्ध होतो तर कुणी शुद्धीवर येतो.जे आपण ठरवलेले असते तेच घडते असे नाही.अचानक त्यामध्ये बिघाड होतो.दूसरेच काहीतरी घडते.कधी अचानक घरी पाहुणे येतात तर कुणी अचानक घरातून निघून जाते.अचानक एखादी बातमी येते तर अचानक कुठेतरी पुल कोसळतो.
 अचानक घडणाऱ्या घटना विस्मयकारक, चकित किंवा थक्क करणाऱ्या असतात.
अचानक कुणीतरी आपल्या जीवनात येते.पाय अचानक घसरतो.अचानक छातीत दुखू लागते तर अचानक कुणी बरा होतो.
 कोणतीही सूचना नसताना,पूर्व कल्पना नसताना,एकदम जे घडते ते अचानक असते.कुणी अचानक रडू लागते,कुणी हसू लागते.अचानक जशी झोप लागते, तशी अचानक जागही येते.विमान अचानक कोसळते,गाडी अचानक बंद पडते.
कुणाची
अचानक बदली होते तर कुणाचे प्रमोशन.
कधी कुत्रा अचानक चावतो,तर कधी अचानक कुत्रा आडवा येतो.अचानक घडणाऱ्या घटनांचा काही थांगपत्ता नसतो.
सर्व भाकिते तिथे फोल ठरतात.परंतू जे अचानक घडते असे वाटते, ते देखील काही कारणाने घडलेले असते.
आपल्यासाठी ते अचानक असते,नंतर मात्र कारणांचा शोध घेतला जातो.
अचानक पाऊस सुरू होतो.अचानक ऊन पडते.अचानक एखादी गोष्ट रद्द होते.सर्व मृत्यू आकस्मिक मानले जाते.कुठे कुणी अचानक पळू लागतो,तर कुणी अचानक खाली बसतो.अचानक घडणाऱ्या घटनांचे पडसाद उमटतात.कितीही नियोजन केले तरी अचानक काय घडेल सांगता येत नाही.
गाडी चालवताना अचानक डुलकी लागते.
जीवन अचानक घटनांची मालिका आहे,कधी काय घडेल सांगता येत नाही.
आपण एका अज्ञात विश्वात वावरतो आहोत,आपण फार शहाणे आहोत असे मूळीच समजू नका,उलट आपण थोडे वेडे आहोत असेच वाटू द्या.तुमच्या इच्छेप्रमाणे या जगात काहीच घडणार नाही,मग कशाला आदळआपट करता.अचानक घडणाऱ्या घटना आपणास कुठे घेऊन जातील सांगता येत नाही.इथे काहीच भरवशाचे किंवा निश्चित नाही, हे जग जसे अचानक निर्माण झाले आहे,तसे ते अचानक  नष्टही होऊ शकते.
अचानक घडणाऱ्या घटना घडून जातात, तिथे आपण हतबल असतो.जीवन म्हणजे आकस्मिक घटनांची साखळी आहे.फक्त काय घडते बघत रहायचे.
 - 
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.