- नारायण
अत्यंत व्यापक अर्थ असलेला शब्द म्हणजे ज्ञान! ते कुणाला, किती,कशाचे आहे किंवा असावे हा वेगळा विषय!
ज्ञान म्हणजे काय हे अनेक ज्ञानी लोकांनी सांगितले आहे, ज्ञानाच्या कक्षा खुप मोठ्या आहेत.ज्ञानाच्या अनेक उपशाखा आहेत.
ज्ञान हे आतून बाहेर येते की बाहेरुन आत जाते हे बघण्याची गरज आहे.ज्ञान होते की मिळवावे लागते, माहिती म्हणजे ज्ञान की शहाणपण म्हणजे ज्ञान, एखाद्या विषयाचे ते ज्ञान की सर्वंकष जे ते ज्ञान.ज्ञानाची सुरूवात आणि शेवट असतो का, आपण जे ज्ञान मानतो ते खरेच ज्ञान आहे का, जेव्हा ज्ञान नव्हते, तेव्हा कसे चालत होते.माहिती म्हणजे ज्ञान आहे का, फक्त आध्यात्मिक ज्ञान, ज्ञान आहे का.असे कितीतरी प्रश्न निर्माण होतात.
ज्ञान कशाने प्राप्त होते आणि ज्ञानाने काय प्राप्त होते, याविषयी विचार हवा.विवेक किंवा विचार म्हणजे ज्ञान नव्हे का,असेल तर ते कसे.
विद्या म्हणजे ज्ञान आहे का,अमूक विद्या तमूक विद्या म्हणजे ज्ञान का.तर्कबुद्धी म्हणजे ज्ञान आहे का.ज्ञानी कुणाला संबोधले जाते.बुद्धीमान म्हणजे ज्ञानी का.विद्वान आणि ज्ञानी एकच का.पंडीत वगैरे ज्ञानी का.
शहाणपण म्हणजे ज्ञान आहे का, एखाद्या विषयांत पारंगत असणे म्हणजे ज्ञानी का.
ज्ञानाचा काही व्यावहारिक उपयोग आहे का,ज्ञानाची पातळी असते का, प्रमाण असते का,सर्व ज्ञान सारखे असते का, ज्ञान बदलते का, ज्ञान चिरस्थायी असते का.
अल्प ज्ञान,अघोरी ज्ञान वगैरे असे काही आहे का, ज्ञान हा ऐकण्या बोलण्याचा विषय आहे की व्यावहारिक उपयोग आहे.ज्ञान हे सर्वदा उपयोगी का,ज्ञानावर मात करेल असे काही नाही का, ज्ञान हे अंतिम सत्य आहे का.ज्ञानाचा काही आधार आहे का, ज्ञान म्हणजे काय मला अजून तरी उलगडले नाही.
मनात अनेक प्रश्न निर्माण होतात , आपण
ज्ञान म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात देऊ शकत असाल तर नक्की द्या.