दिव्यत्वाची जेथे प्रचिती

       दिव्यत्वाची जेथे प्रचिती
                              - ना.रा.खराद
 जीवन जगत असतांना अनेक माणसांशी आपला
संपर्क येतो.बरे वाईट अनुभव येतात.माणसांबद्दल
फार काही चांगले ऐकू येत नाही.चांगली माणसे
उरलीच नाही का ,अशी शंका येते.कुणाबद्दल कुणाचेच मत चांगले दिसत नाही.प्रत्येकजन जसा
आपल्या उणीवा,चूका आणि दोष शोधायला टपलेला दिसतो. हे कलियुग आहे असेच असणार,असे बोलून सर्व मोकळे होतात.सर्वत्र संशयाचे वातावरण आहे.
एखाद्याच्या चांगलेपणावर देखील संशय घेतला जातो.खरेच कुणीच चांगले नसेल का,आपण जसे आहोत तसेच आपणास इतरांच्या बाबतीत वाटत असावे का याचे चिंतन आवश्यक आहे.
 पूर्वी वाईट वर्तनाची बातमी असायची,आता तर कुणी चांगले वर्तन केले की बातमी होते.खरोखर
माणसे इतकी वाईट आहेत का, आपणास फक्त
वाईटच अनुभव येतात का?आपण स्वत: कसे आहोत याचा विचार कधी केला का? 
आपल्या संपर्कातील कित्येक माणसे खूप चांगली
असतात.प्रेमळ, मायाळू असतात.त्यागी , सहनशील, अडचणीत मदत करणारे,योग्य सल्ला
देणारे असतात.त्यांच्या चांगुलपणाचा खुप फायदा आपणास झालेला असतो परंतु आपण करंटे ते जाणत नाहीत.त्याची आठवण ठेवत नाही.
 बसमध्ये स्वत: उभे राहून म्हाताऱ्या माणसाला बसण्यासाठी जागा देणारा मनुष्य ,किती प्रेमळ असेल याची आपण कल्पना करु शकतो.नळावर
पाणी भरतांना , तुम्ही अगोदर भरा म्हणणारी स्री
किती श्रेष्ठ असेल हे आपण समजू शकतो.
शाळेत आजारी मुलाला धावत दवाखान्यात घेऊनजाणारा शिक्षक किती कनवाळू असेल हे काय आपणास कळत नाही.
माणसे माणसाच्या उपयोगी पडतात,ती माणसे काय चांगली नाहीत.इतरांचे काम व्हावे म्हणून झटणारी माणसे आपणास दिसत नाहीत?
बुडणारास वाचवणारी माणसे आपण बघत नाहीत? मित्रत्व,शेजारपण सांभाळणारी माणसे
आपण कधी शोधली का? सत्याच्या मार्गावर चालणारी,न्यायी माणसे कधी ओळखली का?
साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेले कित्येक
हिरे आपणास दिसत नाही का?
तत्त्वनिष्ठा, सिद्धांतवादी, प्रतिभावान माणसांना
आपण जाणतो का? मधुर भाषी माणसे का नसतात का? अत्यंत कष्टाळू माणसे तर हजारों
असतात,त्यांचे कष्ट कधी आपण जाणतो का?
सरळ मनाची, निष्कपट माणसाचे सानिध्य कधी
लाभले तर नत झालात का? 
पायी चालणाऱ्यास आपल्या गाडीत बसवणारे.
उपासींना घास भरवणारे हे माणूसकीचे झरे आपल्या अवतीभवती असतात. अनेक गुणी माणसे आपल्या संपर्कात येतात.त्यांचे गुण हेरले पाहिजे.गुणीजनांचा मान राखला पाहिजे.
त्यांच्याविषयी कृतज्ञ असले पाहिजे.आपण
गुणग्राहक,गुणपुजक असले पाहिजे.जिथे दिव्यत्व
तिथे नतमस्तक व्हावे.गुण वाढीस लागावेत.
           
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.