मोबाईल,हो आजच्या काळाची गरज, परंतु या मोबाईलने सर्वांवर मोहीनी घातली आहे.बालके, तरुण, वृद्ध,पुरुष ,स्री सर्वांनाच.
कुणी कुणाला आवरावे,सगळे एका माळेचे मणी ! परंतु त्याचे दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत, सर्वांच्या बाबतीत.तुर्तास स्त्रियांच्या बाबतीत विचार करुयात.विवाहित
स्त्रियांच्या बाबतीत.
विवाहासोबतच स्त्रियांवर अनेक जवाबदाऱ्या येऊन पडतात.पुरुषांवर तर अगोदरच असतात.नोकरी, व्यवसाय सांभाळावा लागतो,नियम पाळावे लागतात, मोबाईलच्या वापरावर निर्बंध असतात.स्रियांनी मोबाईल वापरु नये,मी या मताचा नाही,तो अवश्य वापरला पाहिजे, परंतु त्यामुळे आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.मोबाईलमुळे नवरा,मुले, पाहुणे यांच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर तो
वापर हानिकारक आहे.लहान मुलांना मोबाइलपासून दूर ठेवणारे आपण आणि आपणच त्यापासून दूर राहत नाही तेव्हा मुले आपलं ऐकू शकत नाही.मोबाईल हा सुखी संसारातील अडसर ठरू नये.मोबाईल ही एक वस्तू नसून, ते एक आभासी जग आहे.कुणालाही मोह पडावा असे ते विश्व आहे, परंतु हे फक्त जगाला बघणे आहे.आपले जीवन काय हे महत्त्वाचे आहे.मोबाईल बंद ठेवून कुटुंबातील लोकांशी, शेजारच्या लोकांशी गप्पा मारल्या पाहिजेत.आपल्या चिमुकल्या मुलांशी खेळले पाहिजे.काहीतरी क्रियाशील केले पाहिजे.मोबाईल फक्त इतरांचे दाखवत बसतो आणि आपण बघत बसतो.आपण काही तरी केले पाहिजे.मी देखील मोबाईलचा वापर करतो गाणी गाण्यासाठी, लिहिण्यासाठी तोही निश्चित वेळेत.कोणेतेही काम सोडून मोबाईलचा वापर करु नये.अनेक अनर्थ त्यामुळे ओढली जातात.
कुणाशी बोलताना, ऐकताना हातातला मोबाईल बंद ठेवला पाहिजे.लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
मोबाईलमुळे जसे शारिरीक दुष्परिणाम होतात तसे ते मानसिक देखील होतात.मोबाईलच्या आहारी गेलेले लोक मनोरुग्ण होण्याच्या मार्गावर आहेत.अत्यंत क्रुर ते होऊ शकतात.अकाली अंधत्व येते आहे, बहिरेपणा येतो आहे.
मोबाईलचा वापर योग्य वेळी, योग्य कामासाठी, योग्य तितकाच केला पाहिजे.कायम त्यामध्ये डोके घातले तर डोके
बिघडते आणि एकदा ते बिघडले की सगळे बिघडते.आयुष्याचा खेळ खंडोबा या मोबाईलमुळे होऊ शकतो.
मोबाईलच्या वापराबाबत थोडा विवेक,संयम बाळगूया.आपले कर्तव्य अगोदर पार पाडूया.आपली माणसे दूरावणार नाहीत ह्याची काळजी घेऊया.