जर तुम्ही...!

जर तुम्ही...!
                     - ना.रा.खराद
 जर तुम्ही स्वार्थी असाल ...
आणि आपल्या स्वार्थासाठी इतरांचा स्वार्थ हिसकावत असाल
 जिथे तिथे फक्त स्वार्थ बघत असाल 
साधनसुचितेचा विवेक बाळगत नसाल
तर तुमचा विनाश अटळ आहे.
   जर तुम्ही अहंकारी असाल ...
आणि त्यामुळे इतर लोकांचा अवमान करत असाल 
आणि केलेल्या कामाचा अहंकार बाळगत असाल आणि मी शब्दाचा अति वापर करत असाल आणि वर्चस्व गाजवत असाल 
तर तुमचा विनाश अटळ आहे.
   जर तुम्ही खोटारडे असाल ...
     सत्याचे तुम्हाला वावडे असेल आणि 
   तुम्ही सत्य स्विकारत नसाल 
   खोटेपणाच्या बळावर काही मिळवू बघत असाल व खोट्या लोकांची टोळी तयार करत असाल 
तर तुमचा विनाश अटळ आहे 
  जर तुम्ही अज्ञानी असाल...
तुमच्याकडे विवेक बुद्धी नसेल आणि 
ज्ञान तुमच्या गळी उतरत नसेल व
ज्ञानी लोकांना शत्रू समजत असाल 
 त्यांच्या विरुद्ध कारस्थान व कुभांड रचत असाल...
तर तुमचा विनाश अटळ आहे 
 जर तुम्ही...
 इतिहासातून काहीच शिकले नसाल 
विद्या विनयेन शोभते 
सत्यमेव जयते आणि 
यदा.यदा..धर्मस्य.
ह्याचा अर्थ तुम्ही जर कळून घेतला नसेल
तर तुमचा विनाश अटळ आहे 
  जर तुम्ही मित्रद्रोही असाल 
मित्रांशी कपटी भावनेने वागत असाल आणि 
त्यास दगा देत असाल व मित्राच्या खोड्या करत असाल,त्याची माघारी निंदा करत असाल व त्याची प्रगती तुम्हाला खपत असेल
तर तुमचा विनाश अटळ आहे 
  जर तुम्ही..
  अधिकाराचा गैरवापर करत असाल 
  इतरांचा छळ आणि शोषण करत असाल 
 मन मानेल तसे वागत असाल 
   मी मानतो तेच खरे असे समजत असाल 
 आणि तर्क बुद्धी गमावली असेल आणि संयम राखत नसाल तर 
तुमचा विनाश अटळ आहे 
     जर तुम्ही निंदक आणि चुगलखोर असाल 
      रागीट व चिडचिडेपणा करत असाल 
आपल्या अंगी सहनशीलता व सौजन्यशीलता
नसेल व मानसिक रुग्ण असाल 
तर तुमचा विनाश अटळ आहे 
   जर तुम्ही पाताळयंत्री, महत्वाकांक्षी व
  छळवादी असाल 
परपीडेचे सुख बाळगत असाल 
जर संशयी आणि सनकी असाल 
गर्विष्ठ व कुत्सित असाल 
तर तुमचा विनाश अटळ आहे 
 जर तुम्ही....
   दुष्ट आणि दोषी असाल 
   पापी व पाताळयंत्री असाल 
    तर तुमचा विनाश अटळ आहे.
     जर वरील दोष तुम्ही दूर केले नाहीत तर 
तुमचा विनाश अटळ आहे.

      




 
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.