नीच लोक

            नीच लोक 

मानवी प्रवृत्तीमध्ये नीच वृत्तीचे काही लोक असतात.नीचपणाची वृत्ती खूप घाणेरडी असते.इतरांना त्रास देण्यासाठी हे लोक वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात.एरवी गोड बोलून जवळीक साधून चारचौघात मात्र तोंडघशी पाडतात.नीच वृत्ती इतरांचा द्वेष, अपमान करणारी असते. 
    नीच लोकांची वाणी विखारी असते.त्यातून
ओकली जाणारी गरळ समोरच्या व्यक्तीला वेदना देते, इतरांना वेदना होईल असे वागणे,बोलणे
नीच लोकांची गरज असते.एखाद्या विषारी 🐍 साप किंवा 🦂 विचंवा प्रमाणे हे सावज शोधतात.संपर्कातल्या माणसाला दंश करून नामानिराळे होतात.
  नीच लोक तत्वहीन, खोटारडे असतात.आपल्या स्वार्थासाठी शब्द फिरवतात.तोंडघशी पाडतात.नीच लोकांची वाणी खूप मधुर असते.आपल्या गोड बोलण्याने इतरांना आपलंसं करून सर्व गुपित माहिती करु घेतात आणि ते सार्वजनिक करतात ‌.
नीच लोक कारस्थानी असतात.आपले इच्छित साध्य करण्यासाठी किंवा इतरांचे इच्छित हाणून पाडण्यासाठी हे लोक अहोरात्र षडयंत्र रचतात.
  नीच लोक चुगलखोर असतात, कंड्या किंवा वावड्या पसरविण्यात पटाईत असतात.बुद्धीने चालाक असलेले हे लोक वृत्तीने खूप हलकट असतात. नीच लोक उपकार विसरतात, कृतघ्न वृत्तीची ही अत्यंत हलकट जमात असते.
  टोचून बोलणे,झोकाचे बोलणे,टर उडविणे अशा
माध्यमातून आपला नीचपणा दाखवत असतात.नीच लोक सतत काड्या करत असतात, कुरापती काढत असतात.इतरांची सुख शांती, वैभव या लोकांना खपत नाही.इतरांना मागे खेचण्यासाठी प्रयत्न करतात.निंदा करत राहतात.स्वत:चे सौख्य हरपून बसलेले हे लोक इतरांना देखील नीट जगू देत नाही.नीच लोक घृणास्पद काम करण्यात पुढे असतात.कानं भरणे,कळ लावणे असले उद्योग सुरू असतात.
स्वाभिमान शून्य नीच लोक जिथे तिथे वातावरण दुषित करतात.भांडणे लावणे, विपर्यास करणे त्यांना सहज जमते.चांडाळचौकडीचे ते मुखिया असतात.
  नीच लोकांची संगत खूप धोकादायक असते.या लोकांना ओळखायला वेळ लागतो.यांचे तोंड ठेसणे आवश्यक असते.जगासमोर त्यांचा खरा चेहरा आणला पाहिजे.नीच लोकांना त्यांच्या नीचपणाची शिक्षा मिळाली पाहिजे.
                               - ना.रा.खराद
                         मत्स्योदरी विद्यालय,अंबड
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.