duty

                      Duty
                                - ना.रा.खराद
 ड्युटी किंवा कर्तव्य हा नोकरीचा एक भाग असतो.कोणतेही कर्तव्य लहान किंवा मोठे नसते,तो एक दुवा असतो, समन्वय असतो.
ATM च्या रक्षणासाठी दोनशे रुपयांचा माणूस असला तरी तो दोनशे कोटींची रक्कम सांभाळत असतो.त्याचे मोल त्यावेळी दोनशे कोटी असते.
 आपली ड्युटी निभावत असताना, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.वरिष्ठ आणि कनिष्ठ ह्यांच्या मधील ड्युटी तर खूप क्लेशदायक असते. कसाबला पकडणाऱ्या पोलिसाची किंमत त्याने वाचवलेल्या लोकांच्या प्राणाइतकी असते.
  ड्युटी मध्ये केलेली चूक किंवा लापरवाही खूप महाग पडत असते.ड्युटी निभावत असताना इतरांशी आपला संपर्क येतो,आपली वर्तणूक सौजन्यशीलतेची असली पाहिजे.राग,लोभ, द्वेष 
यासारखे दोष दूर केले पाहिजेत व सत्य मार्ग स्विकारला पाहिजे.
   ड्युटी हा काही उपकार नसतो,त्याचा मोबदला आपणास मिळत असतो.आपले कार्य सर्वोत्तम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपणास जाब विचारण्याचा , सूचना करण्याचा अधिकार वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांना असतो.तिथे आगपाखड करणे अनैतिक आहे, उर्मटपणा आहे.
  ड्युटी ही आपली गरज असते.गरजवंत असून जर बेफिकीर असणं मूर्खपणाचे आहे.आपले जीवन ड्युटीच्या बळावर सुरक्षित व आनंदी असते, त्यामुळे त्याविषयी कृतज्ञता बाळगणे गरजेचे असते.कामाच्या ठिकाणी अरेरावी कधीही निषेधार्ह आहे. वरिष्ठांचा मान राखून आपले कर्तव्य बजावले पाहिजे, वरिष्ठांशी नाहक संघर्ष करुन आपला अंहकार सुखावण्याचा प्रयत्न कधीच करु नये.
  ड्युटीचा काळ आपण नोकर असतो,तिथे मालकासारखे वागू नये.मन मानेल तसे बेताल वर्तन नुकसानकारक ठरू शकते.आपले व्यक्तीगत दोष आपणास कधीतरी त्रासदायक ठरतात.स्वभावाला मूरड घालता आली पाहिजे.
  आपण वरिष्ठ असो वा कनिष्ठ कोणत्याही पदावर असू ,त्या पदाची कर्तव्य ठरलेली असतात.ती त्या व्यक्तीला पार पाडावी लागतात.ती पार पाडत असताना,इतर घटकांचे सहकार्य अपेक्षित असते, असहकार हा एक प्रकार विरोध असतो.आणि यामुळे दुही माजते.
 ड्युटीवर त्याचा परिणाम होतो.मानसिक स्वास्थ्य ढासळते आणि संबंधित कार्यालयाची हानी होते.
  कुणाचाही उपमर्द किंवा अवमान न करता कर्तव्य पार पाडता आले पाहिजे.एकमेंकाचा आदर राखत कार्य उरकता आले पाहिजे.कोणतेही मतभेद हे वैचारिक पातळीवर राहिले पाहिजेत.व्यक्तिगत द्वेष कधीच करु नये.
     ड्युटी ही एक तपश्चर्या आहे.जो ती उत्तम पार पाडतो,तो उत्तम कर्मचारी होय.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.