चुगलखोर

चुगलखोर
                  - ना.रा.खराद
माणसामधली चूगलखोर एक अमानवी जमात आहे.जगातील बहुतेक भांडणे ह्याच
जमातीची देन आहे.चूगलखोरांना ओळखणे
सोपे नसते.ही जमात वेळोवळी हवे तसे रुप पालटणारी असते.आपली कारस्थाने अत्यंत
गुप्तपणे यशस्वी करण्यात या लोकांचा हातखंडा असतो.'कान भरणे' ही म्हण याच
लोकांमधून उदयास आली.चूगलीखोरीचा धंदा नेहमी जोमात असतो.तो एखाद्याच्या घरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवता येतो.हा फार मोठा उद्योग आहे.अनेकांची पोटे यावर भरतात.यासाठी
कुठलेही बाह्य भांडवल लागत नाही , फक्त
अंगी नीचपणा हवा असतो.नीचपणातूनच चूगलखोरीचा जन्म होतो.चूगलखोरांनी अनेक चांगली माणसे व चांगली बाब उध्दवस्त करुन दाखवली आहे.चूगलखोरांचा वावर सगळीकडे असतो.कुणाच्या तरी कानाजवळ ते निश्र्चित
सापडतात.इकडचे तिकडे तेल मीठ लावून
सांगता येणे हे कौशल्य त्यांच्याकडे असते.आपणास हवे तसे ,हवे ते सांगण्याची
कला त्यांच्याकडे उपजत असते.या दूर्गुंनाच्या
जोरावर अनेकांना देशोधडीला लावण्याचे पातक या लोकांनी केले आहे.
ऐकणाऱ्याचे कान कच्चे असतील तर हा धंदा
लवकर फोफावतो.ऐकणारा मूर्ख असेल तर धंद्याला बरकत येते.ऐकणारा अंहकारी असेल तर तो अंहकार कसा दुखवायचा याचे बाळकडू या लोकांकडे असते.लोकांना नामोहराम करणे ह्यात यांचे सुख दडलेले असते.
चूगलखोरी लिंगभेद करत नाही,जातीभेद मूळीच नाही.ही संपूर्ण जमात एकदिलाने चूगलवादी असतात.यांचे साम्राज्य फार मोठे असते.साम्राज्य निर्माण व नष्ट करण्याचे कसब त्यांच्याकडे असते.चूगलखोरांना ओळखणे शक्य नसते.आपली ओळख लपवणे यावर चूगलीखोरीचे यश अवलंबून
असते.जगातील सर्व कटकटी लावण्याचे काम हिच टोळी करत असते.यांचे विचरण सर्वत्र असते.मानाचे स्थान ते मिळवतात.
कित्येकांची मैत्री हे लोक तोडून दाखवतात.यांनीअनेक देश देशोधडीला लावले आहेत.चूगलखोर हा न दिसणारा शत्रू आहे.त्याची फक्त लक्षणे आहेत.परिणाम आहे पण तो दिसत नाही.तो महामारी सारखा पसरत आहे.अनेक निरपराध,निरोगी लोकांचे तो बळी घेत आहे.किमान त्यांच्यापासून सावध असले पाहिजे.लावालावी करणारे कितीही असो, परंतु ऐकणारे कच्च्या कानाचे असू नयेत.
                                 
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.