- ना.रा.खराद
मनुष्य विविध कार्य करतो पैकी करावे लागतात.कार्य आवडीचे असेल तर फार तन्मयतेने केले जाते.न आवडणारे कार्य एकाग्रतेने केले जात नाही.परंतु जे करावेच लागते ते देखील मग्नतेने केले की आवडायला लागते.
पक्षी आपले घरटे अथवा मुंग्या आपले वारुळ
किती तन्मयतेने बनवतात.आपल्या कार्यात
किती मग्न असतात.मोठमोठी कार्य करुन दाखवणारी माणसे आपले कार्य किती मग्नतेने करतात.अनेक विशाल ग्रंथ तन्मयतेनेलिहिली गेली.संतानी जे ग्रंथ रचना केली किती मग्न असतील ते आपल्या कार्यात.बस चालक घाटातून बस चालवतो,
एकाग्रतेशिवाय हे होते का? लहान लहान
मुलांना शिकवण्यात रमलेला शिक्षक किती तन्मय असतो.गाडगे बनवणारा कुंभार असो की कपडे शिवणारा शिंपी आपले कार्य जेव्हा
तो मग्नतेने करतो तेव्हाच ते चांगले होते,कार्य उत्कृष्ट होते.ही तन्मयता ज्यास साधली तो यशाचे शिखर गाठतो.
आपण आपल्या कार्यात मग्न असले की इतरांच्या उचापती , कुरापती काढण्यास वेळ मिळत नाही.घरात स्वयंपाक करण्यात गढून गेलेली गृहिणी चवदार जेवण बनवते.
मन लावून शिकवणारा शिक्षक मुलांना आपल्याकडे आकर्षित करतो.मुले घरदार विसरुन शाळेत रमतात.हे रमणे म्हणजेच कार्यमग्नता.जात्यावर दळण दळणाऱ्या स्त्रिया,ऊसतोड करणारे कामगार, शेतात नांगर हाकणारा शेतकरी,कापणी करणारे मजूर गाणे गात आपले कार्य सुरू ठेवतात.
एकाग्रतेने कार्य केल्याविना सर्वोच्य यश लाभत नाही. दगडांची मूर्ती बनवणारा मूर्तिकार हातोडा आणि छन्नीचा उपयोग करतांना किती मग्न असतो.लक्ष विचलित न
होऊ देणे, आपल्या कार्यात लक्ष ओतणे हिच
तर कार्यमग्नता आहे.अशा लोकांना कामात
किती वेळ गेला कळत नाही उलट त्यांना वेळ
कमी पडतो
अचूक निशाणा लावण्यासाठी , वैद्यकीय क्षेत्रातले वैद्य आपल्या कामात किती मग्नअसतात म्हणून तर ते मोठमोठ्या शस्त्रक्रिया करू शकतात.सीमेवर पहारा देणारे सैनिक ,डोळ्यांत तेल घालून जागे असतात.आपल्या कार्यातली त्यांची मग्नता वाखाणण्याजोगीच आहे.
लहान लहान कार्य करतांना देखील ही मग्धता हवी असते.चरख्यातून ऊसाचा रस काढणे असो की तेल घाणा किती काळजी घ्यावी लागते.वेगवेगळी कामे करणारी सर्व
माणसे आपापले कार्य करणात मग्न असतात.दागिने बनवणारा सोनार असो वा लोखंडाची औजारे बनवणारा लोहार असो कार्यमग्न असतात.विविध विभागात कार्यरत कर्मचारी बघा कसे आपल्या कामात व्यग्र दिसतात.रिकामा वेळ असा नसतोच.यामुळेच कार्य उरकते.कार्यातले सातत्य आणि त्यातील मग्नता हेच यशाचे सुत्र आहे.ज्याने ते अंगिकारले तो यशस्वी झाला.