आई

                                                                    आई


जमवून काड्याकुड्या पेटवलिस तु चूल
विझवू दिला नाही अग्नी,
उपाशी मरू नये म्हणून मुल
डोईवर ओझे सरपनाचे 
तुडवित काटे चाले वाटे
कधी दाटे काळोख 
जग भेसूर वाटे 
चिल्यापिल्याच्या खळगीसाठी
नयनी अश्रु दाटे
जीवघेणे ओझे ते
जीवन नको वाटे
दिसे ते भुकेलेली लेकरे
त्यांच्यासाठी जीव तुटे
पायी वहान ती खिळे तीचे घुसे
रक्ताळले पाय तरी
पुढे लेकरे दिसे
सोसला संसाराचा सोस जरी
स्वप्न उद्याचे दिसे
होतील मोठी माझी लेकरे
पांग फेटतील ,
विसाव्याला माझ्या 
एक थडगे बांधतील
          - ना.रा.खराद
Tags

एक टिप्पणी भेजें

1 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Firoz Khan ने कहा…
खूपच छान कविता सर