- ना.रा.खराद
माझ्या शर्टचे बटन निखळले होते.सुई दोऱ्याने ते जोडणे गरजेचे होते.मी स्वतःच सुई घेतली आणि त्यामध्ये दोरा ओवू लागलो परंतु काही केल्या दोरा ओवल्या जात नव्हता.माझ्या जवळ माझी मुलगी होती तीने बघितले बाबांना सुईमध्ये दोरा ओवणे शक्य होईना.ती म्हणाली,"बाबा,घ्या इकडे मी ओवते, तुमची दृष्टी आता कमी झाली आहे."
मी सुई आणि दोरा तिच्याकडे सूपूर्द केला आणि गंमत बघू लागलो.काही केल्या दोरा ओवल्या जात नव्हता.शेवटी ती खजिल झाली .तिची ती अवस्था बघून बाजूलाच मुलगा बसलेला होता त्याने आमच्या दोघांची खिल्ली उडविली ," तुम्हाला साधा सुई मध्ये दोरा ओवता येत नाही!" आणि मुलीकडून त्याने सुई दोरा हिसकावून घेतला आणि लागला प्रयत्न करायला परंतु काही केल्या तो दोरा सुईमध्ये ओवल्या जात नव्हता.
आम्ही त्याचे अपयश बघून हसू लागलो तो चिडला व त्याने आईला आवाज दिला.ती लगबगीने आली .मुलाने तिला सर्व प्रसंग सांगितला तीने एका क्षणात सुईमध्ये दोरा ओवला.
यामधून मी तीन गोष्टी शिकलो.
प्रत्येक काम प्रत्येकाला जमत नसते.
इतरांना जे अशक्य ते मला जमेल असे आपणास उगीच वाटत असते आणि इतर जे करतो ते आपणास सोपे वाटत असते.