माणसांच्या अनेक गुणांपैकी सहनशीलता हा एक प्रमुख गुण आहे.तो प्रत्येकाच्या ठिकाणी
कमी जास्त प्रमाणात असतो.अपवादाने सहनशीलता अजिबात नसलेली माणसेही असतात.जीवनभर याच गुणाच्या जोरावर आपण मार्गक्रमण करतो.
आपल्या इच्छेनुसार या जगात काहीच घडत नसते.मनाविरुद्ध घटनांचे आपण साक्षीदार बनतो.जिथे नाइलाज असतो तिथे सहन करणे याशिवाय पर्याय नसतो.तडजोड जिथे
तिथे सहन करणे असते.अनेक ठिकाणी ,अनेक प्रसंगी आपण खूप काही सहन करतो.जिथे विरोध शक्य असतो तिथेही
आपण सहन करतो.नसलेली कटकट नको म्हणून सहनशीलता दाखवतो.इतरांशी संपर्क
आला की खुप काही सहन करावे लागते.
गर्दीमध्ये तर आपण काय काय सहन करतो.
कुणी धक्का मारतं,पाय तुडविते,थूंकते तरीही
आपण गर्दीमध्ये असे चालायचेच म्हणत ते सर्व सहन करतो.कुणी मोठ मोठ्याने बोलते,अगदी कानठळ्या बसतात तरीही त्याचे ऐकूण घेतले जाते.घरामध्ये नवरा बायको एकमेकांचे खुप काही सहन करत असतात.सहनशीलतेमुळेच संसार टिकून असतो.
भारतीय लोक तर फारच सहनशील आहेत.शेकडों वर्षे राजेशाही,नंतर इंग्रजांनी
दिडशे वर्षे गुलाम बनवले सर्व सहन केले.
सहनशीलता कधी गुण म्हणून वावरते तर कधी दोष.आपण कुणाचे काय आणि का सहन करतो यावरुन तीचे मोल ठरते.मालक
नोकरांना शिव्या देत असेल आणि तो सहन
करत असेल तर यामागची कारणे,त्यास कामाची गरज आहे.मालक आहे बोलतच असतात किंवा तो नोकर चुकलेला असेल.
गरजवंतला सहन करावेच लागते.अन्याय सहन केला जातो कारण विरोध करण्यासाठी
लागणारे बळ नसते अथवा त्यामागे स्वार्थ
असतो.
आई आपल्या मुलांचे संगोपन करतांना खूप काही सहन करते ते प्रेमामुळे.देशभक्तांनी शिक्षा सहन केली देशासाठी.सहनशीलतेलाही
मर्यादा असतात.सहनशीलतेचाही उद्रेक होत
असतो.काहींना आयुष्यात खुप काही सहन
करावे लागते.दुष्काळाचे चटके सहन करावे
लागतात.गरीबीच्या झळा सोसाव्या लागतात.
अपमान सहन करावा लागतो.
इतक्या तितक्या कारणावरून हमरीतुमरीवर येणे योग्य नसते , म्हणूनच सहनशीलता उपयोगाची ठरते.एखाद्या आजाराच्या वेदना,मनातली सल सहन केली जाते.जगात
वावरतांना सगळे काही मनाप्रमाणे घडत नसते.मनाविरुद्ध जे आहे ते सहन करावेच लागते.
सहनशीलता अनेकवेळा दोष ठरतो.इतरांच्या
भल्यासाठी किंवा सुखासाठी त्रास सहन करणारी महान माणसेही असतात.सत्यासाठी
न्यायासाठी झटणारे लोकांचा रोष सहन करत
असतात.गुंडाकडुन होणारा छळ सहन केला
जातो.अनेकांना भूक सहन करावी लागते.
जिथे त्रास आहे तिथे सहनशीलता आहे.
सुन सासुचा,सासु सुनेचा छळ सहन करते.
कुणी होणारी निंदा सहन करते.निसर्गाकडून
होणारे नुकसान सहन करावे लागते.
कुठे शेजाऱ्याचा त्रास सहन करावा लागतो.
एखाद्याचे न आवडणारे भाषण सहन करावे लागते.जीवन ऐच्छिक कमी अनैच्छिकच जास्त असते.सहनशीलतेच्या जोरावरच त्यावर मात करता येते.सहनशीलतेच्या अभावामुळे कित्येक आत्महत्या होतात.
सहन होण्यासारखे सहन केलेच पाहिजे.जे
सहन होत नाही,तिथे विरोध केला पाहिजे.
सहनशीलता जिथे गुण आहे तिथेच त्याचा
अवलंब व्हावा.जिथे तो दोष ठरेल तिथे ती
मुळीच असू नये.
- ना.रा.खराद