सगळेच दिवस चांगले नसतात
नसतात सगळेच वाईट
हे कळेलच तुला कधी ना कधी
मात्र हे देखील लक्षात घे
जीवन कार्यक्षेत्र असते कर्तव्याचे
तसेच त्यागाचेही
त्रास देणारे असतात तसेच
साथ देणारेही
गुण ओळखणारे असतात तसे
गुण नाकारणारेही
असतात हात धरणारे तसे
पाय ओढणारेही
ध्यानात ठेव
घाम गाळल्याशिवाय यश
मिळत नाही
बौद्धिक कष्ट तरी करावेच लागतात
आपले गुण गुप्त राखावे आणि
दोष उघडे करावेत
खोटेपणापासून दूर राहून
खरेपणास जवळ धरावे
भिती बाळगू नये कशाचीही
निर्भय जगावे
शक्य तितकी पुस्तके वाचावित
सार घेऊन, असार सोडावे
अन्याय दिसताच अस्वस्थ वाटावे
झगडावे त्या विरुद्ध
प्रेम करावे सर्व जगावर मात्र
मोबदला मागू नये प्रेमाचा
यश मिळवावे सरळ मार्गाने
त्यासाठी खटाटोप करु नये
स्वतः वर विश्वास हवा
इतरांनी चूक ठरवले तरी
छळू नये कुणाला कधीच
मात्र नमू नये गुंडासमोर
सर्वांचे ऐकून घ्यावे
अगदी मूर्खांचेही
मात्र शहाण्यासमोर
वटवट करु नये
गप्प रहावं इतरांचे रहस्य जाणून
उघडू नये स्वार्थासाठी कुणासमोर
करावी कमाल कमाई
रात्रदिन श्रम करून
कधीही फूकटचे खाऊ नये
सत्य आणि न्यायाचा मार्ग सोडू नये
खोट्यांच्या फंदात पडू नये
बघावे स्वप्न भविष्याचे पण
वास्तव्याचे भान सोडू नये
करत असला पोटासाठी चाकरी
स्वाभिमान सोडू नये
मुला,तु चांगला माणूस बन एवढेच!
खुप आशिर्वाद.
- तुझे बाबा